आयपीएल २०२१ हंगामात गुरुवारी (३० सप्टेंबर) ४४ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडणार आहे. नाणेफेक ७:०० वाजता होईल आणि सामना रात्री ७:३० वाजता शारजाहा क्रिकेट स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार, महेंद्रसिंग धोनी आणि केन विलियम्सन यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हे दोघेही त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. या दोघांच्या नेतृत्वातील हा सामना रोमांचक होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. चला तर पाहुयात या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभावित प्लेंईग इलेव्हन.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि संघाने स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये जवळपास प्रवेश निश्चित केला आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघाचे या हंगामातील प्रदर्शन फारच खराब राहीले आहे आणि ते प्लेऑफच्या शर्यतीमधून आधीच बाहेर झाले आहेत.
गुरुवारच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या अंतिम ११ जणांच्या संघात फारसा मोठा बदल होण्याची शक्यता नाही. या सामन्यासाठी हैदराबाद संघ डेव्हिड वॉर्नरला बाहेर बसवून जेसन रॉयला संघात कायम करु शकतो. तर, चेन्नई संघ लुंगी एन्गिडीला संघात स्थान देऊ शकतात.
सनरायझर्स हैदराबाद संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
केन विलियम्सन (कर्णधार), जेसन रॉय, वृद्धिमान साहा, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड़, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, लुंगी एन्गिडी.
आयपीएलच गुणतालिकेचा विचार केला तर आमना-सामना होणाऱ्या या दोन्ही संघांमध्ये खूप फरक दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जने खेळलेल्या १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत आणि १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादची परिस्थिती पाहिली तर ती फारच खराब आहे. हैदराबादचा संघ १० सामने खेळला असून त्यातील केवळ २ सामने जिंकू शकला आहे. गुणतालिकेत संघ केवळ चार गुणांसह आठव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल २० वर्षांनी मंधनाने ऑस्ट्रेलियात केला ‘तो’ कारनामा, ठरली जगातील दुसरीच महिला क्रिकेटर
‘या’ तिघांवर विश्वास न ठेवून संघांनी केली चूक; आज गाजवतायेत युएईची मैदाने
टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात होऊ शकतात ३ मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी