दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 7 गडी गमावून 266 धावा केल्या. अशाप्रकारे हैदराबादनं आयपीएलच्या या हंगामात तिसऱ्यांदा 250 हून अधिक धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात केवळ सनरायझर्स हैदराबादनं ही कामगिरी 3 वेळा केली आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दोनदा ही कामगिरी केली आहे. आयपीएल 2013 मध्ये आरसीबीनं 263 धावा केल्या होत्या. तर आयपीएल 2024 मध्ये आरसीबीनं हैदराबाद विरुद्धच 262 धावा केल्या होत्या.
या हंगामात सनरायझर्स हैदराबादनं विक्रमी 3 वेळा 250 हून अधिक धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांनी 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं हंगामात तिसऱ्यांदा 250 हून अधिक धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 7 विकेट गमावून 266 धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 32 चेंडूत 89 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. याशिवाय शाहबाज नदीमनं 29 चेंडूत 59 धावांचं योगदान दिलं. तर अभिषेक शर्मानं 12 चेंडूत 46 धावांची शानदार खेळी केली.
दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवनं 4 बळी घेतले. त्यानं ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, अभिषेक शर्मा आणि नितिश रेड्डी यांना बाद केलं. कुलदीपनं आपल्या 4 षटकांत 55 धावा दिल्या. अक्षर पटेल आणि मुकेश कुमारनं 1-1 बळी घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर