आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. अखेरचा चेंडूपर्यंत अत्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने विजय संपादन केला. 215 धावांचा बचाव करण्यात राजस्थानचे गोलंदाज अपयशी ठरले. एक वेळ हातात असलेला हा सामना त्यांना हैदराबादच्या फटकेबाजांमुळे गमवावा लागला. या सर्वांमध्ये ग्लेन फिलिप्स याने केलेली छोटेखानी खेळी चर्चेचा विषय राहीली.
हैदराबादने या सामन्यात खराब फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रुक याच्या जागी ग्लेन फिलिप्स याला संघात स्थान दिले. त्यांचा हा निर्णय अखेरच्या षटकांमध्ये फायदेशीर ठरला. यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांच्या फलंदाजीमुळे राजस्थानने 3 बाद 214 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादसाठी सर्वच फलंदाज योगदान देताना दिसले. त्याचवेळी अखेरच्या दोन षटकात हैदराबादला 41 धावांची गरज होती.
Glenn Phillips is the game changer. pic.twitter.com/fXoLdpeTy2
— ` (@rahulmsd_91) May 7, 2023
युवा वेगवान गोलंदाज कुलदीप यादव टाकत असलेल्या या षटकातील पहिल्या तीनही चेंडूवर फिलिप्स याने तीन उत्तुंग षटकार खेचले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. पाचव्या चेंडूवर शिमरन हेटमायर याने टिपलेल्या एका शानदार झेलामुळे तो तंबूत परतला. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने केवळ 7 चेंडूवर 25 धावांची प्रभावशाली खेळी खेळत आपल्या संघाला सामन्यात आणले. अखेरच्या षटकात अब्दुल समद याने आवश्यक 17 धावा करत संघाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.
त्याच्या या छोट्याशा खेळीसाठी त्याला थेट सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभावेळी संजय मांजरेकर यांनी यापूर्वी दिनेश कार्तिकला 9 चेंडू खेळून सामनावीर पुरस्कार मिळाला होता अशी आठवण त्याला करून दिली होती.
(Sunrisers Hyderabad Glenn Phillips Impactful Inning Against Rajasthan Royals Hits 3 Consecutive Sixes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयसवालचा भीमपराक्रम! IPLमध्ये ‘यशस्वी’रीत्या 1000 धावा पूर्ण, दिग्गजांना पछाडत केला ‘हा’ विक्रम
असे 5 खेळाडू, ज्यांनी IPLमध्ये हैदराबादविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा; संजू 208 धावांनी विराटच्या पुढे