इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62वा सामना सोमवारी (दि. 15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 7 वाजता गुजरात विरुद्ध हैदराबाद संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक हैदराबाद संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून गुजरात संघ प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, हैदराबाद संघही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबाद संघात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. ग्लेन फिलिप्स संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी मार्को यान्सेन याची ताफ्यात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघातही काही बदल आहेत. दसून शनाका आयपीएल पदार्पण करत आहे. साई सुदर्शन संघात परतला आहे. तसेच, यश दयाल याचीही ताफ्यात एन्ट्री झाली आहे.
🚨 Toss Update 🚨@SunRisers win the toss and elect to field first against @gujarat_titans.
Follow the match ▶️ https://t.co/GH3aM3h0ER #TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/kemFWAVDil
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2023
हंगामातील कामगिरी
गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावणारा संघ आहे. गुजरातने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यांनी 8 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. यासह ते 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. आता हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला, तर गुजरात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल. दुसरीकडे, हैदराबाद संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी फक्त 4 सामने जिंकले आहे, तर उर्वरित 8 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अशात हा सामन जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. (Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to field Gujarat Titans)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, दसून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, टी नटराजन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
‘त्याला संघात न घेण्याचे दु:ख अजूनही…’, पराभवानंतर CSKच्या कोचची KKRच्या ‘या’ खेळाडूबद्दल प्रतिक्रिया
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ