---Advertisement---

RCBvsSRH: पडीक्कल आणि मॅक्सवेलची झुंज व्यर्थ, हैदराबादचा बेंगलोरवर ४ धावांनी विजय

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 11:25 PM
---Advertisement---

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरचा संघ ६ विकेट्स गमावत १३७ धावाच करू शकला. त्यामुळे हैदराबादने ४ धावांनी बाजी मारली.

हैदराबादच्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ४१ धावा केल्या. ५२ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. त्याला राशिद खानने अब्दुल समदच्या हातून त्याला झेलबाद केले. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूत ४० धावांची खेळी केली. परंतु तोही केन विलियम्सनच्या डायरेक्ट हिटवर धावबाद झाला. तसेच एबी डिविलियर्सने नाबाद १९ धावांची झुंज दिली. परंतु तो संघाला विजयी शेवट करुन देऊ शकला नाही.

हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, राशिद खान, उमरान मलिक आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी हैदराबादकडून जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा हे सलामीला फलंदाजीला आले होते. परंतु दुसऱ्या षटकात अभिषेक १३ धावांवर जॉर्ज गॉर्चनचा शिकार ठरला. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि जेसनने चिवट झुंज दिली. परंतु हर्षल पटेलने विलियम्सनला त्रिफळाचीत करत त्यांची जोडी तोडली. विलियम्सन ३१ धावांवर पव्हेलियनला परतला. त्याच्यानंतर प्रियम गर्गनेही (१५ धावा) आपली विकेट गमावली. त्याच षटकात ४४ धावांवर खेळत असलेला जेसनही डॅनियल ख्रिस्टिनच्या जाळ्यात अडकला.

जेसनची महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर हैदराबादचे इतर फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी २० षटकात १४१ धावाच फलकावर लावल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर डॅनियल ख्रिस्टियननेही २ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

असे आहेत उभय संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी उभय संघांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौत बेंगलोरच्या पारड्यात पडला आहे. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे हैदराबादचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानासाठी उतरतील.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्यो कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅनियल ख्रिस्टियन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---