मुंबई| सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सोमवारी (११ एप्रिल) आयपीएल २०२२ मधील २१वा सामना झाला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दोन्हीही संघांच्या कर्णधारांनी धुव्वादार फलंदाजी करत अर्धशतके केली. मात्र गुजरातच्या गोलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन न करता आल्यामुळे हैदराबादने ८ विकेट्सने या सामन्यात बाजी मारली. हा त्यांचा हंगामातील दुसराच विजय आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने २० षटकात ७ बाद १६२ धावा केल्या होत्या. गुजरातच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने ५ चेंडू राखून सामना जिंकला. त्यांनी १९.१ षटकांमध्येच २ विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा करत गुजरातचे लक्ष्य पार केले.
गुजरातच्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार केन विलियम्सनने कडकडीत अर्धशतकी खेळी केली. त्याने ४६ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५७ धावा फटकावल्या. तसेच सलामीवीर अभिषेक शर्मा यानेही ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटी निकोलस पूरन (३४ धावा) आणि ऍडम मार्करम (१२ धावा) यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले.
या डावात गुजरातचे गोलंदाज अपयशी ठरल्याचे दिसले. गुजरातकडून फक्त राशिद खान आणि हार्दिक पंड्यालाच विकेट घेता आल्या.
Nicholas Pooran hits the winnings runs as @SunRisers win by 8 wickets against #GujaratTitans
Scorecard – https://t.co/phXicAbLCE #SRHvGT #TATAIPL pic.twitter.com/F5o01VSEHv
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातची वरची फळी फेल ठरली. परंतु हार्दिक पंड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ४२ चेंडू खेळताना १ षटकार आणी ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. तसेच अभिनव मनोहरने त्याला मिळालेल्या जीवनदानांचा फायदा घेत ३५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना साजेशा खेळी करता आल्या नाहीत.
या डावात हैदराबादच्या गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजी केली. अनुभवी भुवनेश्वर कुमारने ४ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर टी नटराजननेही २ विकेट्सचे योगदान दिले. तसेच उमरान मलिक व मार्को जेन्सन यांच्या पदरीही प्रत्येकी १ विकेट पडली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सीएसकेसाठी पहिला विजय बनणार अजूनच अवघड! आरसीबीच्या ताफ्यात घातक गोलंदाजांची झालीय एन्ट्री
संघ मालकीन निता अंबानींपर्यंत गेली बातमी, मुंबईच्या चौथ्या पराभवानंतर खेळाडूंना फोन करत म्हणाल्या…
राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा नायक ठरलेला ‘रीवा एक्सप्रेस’, वडील चालवतात हेअर सलून; वाचा त्याची कहाणी