इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने सामन्यावर आपली पकड चांगलीच मजबूत केली आहे. ३५४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघापुढे हा सामना वाचविण्याचे आव्हान असेल. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात समाधानकारक सुरुवात केली आहे. केएल राहुलच्या रुपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसला असला तरी, तो बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने त्याला वाचवले होते.
रोहितच्या हुशारीने वाचला राहुल
दुसऱ्या दिवशी बाकी असलेले इंग्लंडचे अखेरचे दोन फलंदाज मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी नऊ धावांत बाद केले. त्यामुळे इंग्लंडची एकूण आघाडी ३५४ धावांची झाली. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केएल राहुल व रोहित शर्मा यांनी केली. पहिला अर्धा तास दोघांनी कोणतीही जोखीम न पत्करता खेळून काढला.
या दरम्यान राहुल काहीसा चाचपडत खेळत होता. तो अनेकदा चकताना दिसला. भारतीय डावाच्या दहाव्या षटकात ओली रॉबिन्सनच्या अप्रतिम इनस्विंग चेंडूवर राहुल फसला व चेंडू त्याच्या पॅडवर येऊन आदळला. पंच रिचर्ड केटलबरो यांनी काहीसा वेळ घेत त्याला बाद ठरवले. तिसऱ्या पंचांकडे दाद मागायची का? हे विचारण्यासाठी राहुल नॉन स्ट्राइकला असलेल्या रोहित शर्माकडे गेला. राहुलला आपण बाद असल्याचे वाटत होते. मात्र, रोहितने त्याला रिव्ह्यू येण्यास सांगितले. पंचांनी बाद दिल्यानंतर १५ सेकंदात तिसऱ्या पंचांकडे दाद मागायची असते. रोहितच्या सल्ल्यामूळे राहुलने अखेरचा एक सेकंद शिल्लक असताना तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली.
https://twitter.com/MyFreakyTweets/status/1431215163642761223
तिसऱ्या पंचांनी बदलला निर्णय
राहुलने रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय बदलला. रॉबिन्सनचा चेंडू यष्ट्यांच्या बाजूने जात असल्याने तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी राहुलच्या बाजूने निर्णय दिला. राहुलला अशाप्रकारे जीवदान मिळण्याचे श्रेय रोहित शर्माला गेले. मात्र, या जीवदानाचा राहुल फायदा घेऊ शकला नाही व ८ धावा काढून माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: हिटमॅनचा नजाकतदार ‘अपर कट’ पाहून येईल सचिन आणि वीरूची आठवण
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून ‘हा’ फलंदाज झळकावणार शतक, भारताच्या १९ वर्षीय खेळाडूची भविष्यवाणी
‘हिटमॅन’चा विक्रमी षटकार! कपिल देव यांना मागे टाकत रोहितने दिग्गजाच्या यादीत मिळवले चौथे स्थान