शुक्रवारी (दि. 12 मे) वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने तडाखेबंद शतक झळकावले. सूर्यकुमारचे हे आयपीएलमधील पहिले वहिले शतक ठरले. विशेष म्हणजे, ही कामगिरी करताच सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्यात एक जबरदस्त योगायोग घडला. चला तर, सूर्या आणि रोहितमधील त्या योगायोगाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएल 2023चा 57वा सामना मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) संघात रंगला. या सामन्यात मुंबई संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी मुंबईने 19.5 षटकात 212 धावा केल्या होत्या. तसेच, विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा 48 चेंडू खेळून 97 धावांवर खेळत होता. हे षटक अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) टाकत होता. जोसेफच्या अखेरच्या चेंडूवर सूर्याने खणखणीत षटकार मारला. त्यामुळे त्याने 49 चेंडूत 103 धावा करून शतक पूर्ण केले. यावेळी मुंबईने 5 विकेट्स गमावत 218 धावा केल्या.
Na dare,
Na basic batting kare.
Wo Surya Dada hai,
Idhar ka ball udhar maare, jab man kare.#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 @surya_14kumar pic.twitter.com/JVL7aXfAEX— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
सूर्यकुमारने या सामन्यात पहिल्या 12 चेंडूत फक्त 23 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने पुढील 31 चेंडूंचा सामना करताना तब्बल 80 धावा चोपल्या. यामुळे त्याने 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 103 धावा पूर्ण केल्या. हे शतक करण्यासाठी सूर्याला तब्बल 120 डावांची प्रतीक्षा करावी लागली. या धावा करताच सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा (Suryakumar Yadav And Rohit Sharma) यांच्यात एक खास योगायोग घडला.
सूर्यकुमार आणि रोहितचा योगायोग
सूर्यकुमारने त्याचे आयपीएलमधील पहिले शतक 12 मे 2023 रोजी पूर्ण केले. विशेष म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही त्याचे आयपीएलमधील पहिले शतक हे 11 वर्षांपूर्वी 12 मे 2012 रोजी पूर्ण केले होते. यातील आणखी एक योगायोग असा की, सूर्याने त्याचे हे शतक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साकारले, तर रोहितनेही त्याचे पहिले शतक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाच केले होते.
.@surya_14kumar's blistering maiden IPL century powered @mipaltan to 218/5 👊
Can the @gujarat_titans chase this down? 🤔
Chase starts 🔜
Follow the Match: https://t.co/o61rmJX1rD #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/8a6TswHTZa
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
सूर्यकुमार यादवची हंगामातील कामगिरी
सूर्यकुमार यादव याने हे शतक पूर्ण करत आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत थेट तिसऱ्या स्थानी पोहोचला. सूर्याने आतापर्यंत 12 सामने खेळताना 43.55च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, गुजरातविरुद्धच्या शतकाव्यतिरिक्त सूर्याने हंगामात 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. (superb coincidence by Rohit Sharma And Suryakumar Yadav Maiden IPL Century On 12 may know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत सूर्याने झळकावले IPLचे पहिले शतक, मुंबईचा स्कोर 200च्या पार
Breaking । विंडीज संघाच्या Head Coach पदी ‘या’ 2 दिग्गजांची निवड, एक तर दोन वेळचा टी20 चॅम्पियन