कन्नड सिनेमाचे सुपरस्टार पुनीर राजकुमार आता या जगात राहिले नाही. त्याचे निधन शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) वयाच्या ४६ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले. पुनीत यांना बेंगलोरच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते. त्यांना सकाळी ११.४० च्या सुमारास हॉस्पिटलच्या एमर्जंसी डिपार्टमेंटमध्ये आणले गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई पुनीतच्या तपासणी करताना उपस्थित होते. पुनीत यांच्या निधनाची माहिती क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक ट्वीट करून दिली आहे.
वेंकटेशने त्याच्या ट्वीटमध्ये पुनीतच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, “हे सांगताना खूप दु:ख होत आहे की, अभिनेते पुनीत राजकुमार नाही राहीले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना माझ्या संवेदना.”
याव्यतिरिक्त वेंटकेशने चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी शांती कायम ठेवावी आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करावे. वेंकटेशच्या या ट्वीटनंतर क्रिकेटजगतातील अनेकांनी पुनीतच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/venkateshprasad/status/1454004644586278915
वेंकटेशव्यतिरिक्त भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग याने पुनीतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, पुनीत कुमारच्या निधनाविषयी ऐकून खूप दु:ख झाले. स्नेही आणि विनंम्र, त्यांचे निधन भारतीय सिनेमासाठी खूप मोठा झटका आहे. त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी. शांती.
https://twitter.com/virendersehwag/status/1454007368593797124
सेहवागप्रमाणेच हरभजन सिंगनेही ट्वीटरवर शोक व्यक्त केला आहे. त्याव्यतिरिक्त वासिम जाफर, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, केएल राहुल, मयंक अगरवाल अशा अनेक क्रिकेटपटूंनी देखील ट्वीटरवर शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/harbhajan_singh/status/1454010479756513282
https://twitter.com/robbieuthappa/status/1454023241668825090
https://twitter.com/RCBTweets/status/1454024907830874115
https://twitter.com/WasimJaffer14/status/1454022272251875334
https://twitter.com/anilkumble1074/status/1454010879016521733
https://twitter.com/ImRaina/status/1454029600288280577
https://twitter.com/mayankcricket/status/1454032291064270860
https://twitter.com/klrahul11/status/1454093230169944076
पुनीतने त्याच्या कारकिर्दीत २९ पेक्षा जास्त कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका बालकलाकाराच्या रूपात केली होती. त्या काळात त्यांना बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. युवारत्न हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला, जो यावर्षी प्रदर्शित झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय वंशाचा किवी गोलंदाज टीम इंडियासाठी ठरणार मोठी डोकेदुखी? टी२०मध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
…तरच हार्दिकला न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी? फिटनेसविषयी आली मोठी अपडेट