भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या मैत्री बद्दल सर्वांनाच माहिती आहे. या दोघांना भारतीय क्रिकेटमधील जय-वीरू म्हणले तरी चालते. दोघांची मैत्री खूप जुनी आहे, यामुळे सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीनंतर एकाच दिवशी आपली निवृत्ती घोषित केली होती.
दरम्यान, अनेक क्रिकेट चाहत्यांचे असे म्हणणे आहे की सुरेश रैना खराब कामगिरी केल्यानंतरही धोनीमुळेच भारतीय संघामध्ये स्थान टिकवून ठेवू शकला आणि यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द खूप दिवस चालली. सुरेश रैनाने भारतासाठी अनेक वेळा उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि भारताला विजयही मिळवून दिला आहे
सुरेश रैनाने दिले उत्तर
या चर्चा सुरेश रैनालाही अस्वस्थ करत होत्या म्हणूनच सुरेश रैनाने आपल्या ‘बिलिव्ह’ या पुस्तकात या प्रश्नांवर उघडपणे भाष्य केले आहे. सुरेश रैनाने लिहिले की, “असे म्हणतात की धोनीमुळे मला भारतीय संघामध्ये संधी मिळाली पण माझ्या क्षमतेमुळे मी भारतीय संघाचा भाग होतो हे मला सांगायचे आहे. जेव्हा लोक आमची मैत्री माझ्या भारतीय संघात मध्ये स्थान मिळवण्याशी जोडतात तेव्हा मला खूप त्रास होतो.”
त्याने पुढे लिहिलं, ‘माझ्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी करुन घ्यावी हे धोनीला माहित होतं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्याप्रमाणे मला महेंद्रसिंग धोनीचा विश्वास आणि आदर मिळाला आहे, त्याचप्रमाणे मी नेहमीच माझ्या खेळातून भारतीय संघामध्ये माझे स्थान टिकवले आहे.”
सुरेश रैनाहा भारतीय संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू होता , त्याने अनेकदा आपल्या खेळीने भारतीयसंघाला विजय मिळवून दिला आहे.
सुरेश रैनाची कारर्कीद
सुरेश रैनाने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून ७६८ धावा केल्या आहेत, त्यात एक शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने भारताकडून वनडेमध्ये २२६ सामने खेळले आहे व त्यात ५६१५ धावा करण्यात त्याला यश आले आहे, त्यात ५ शतक आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाची वनडेमधील सर्वाधिक धावसंख्याही ११६ आहे. याशिवाय सुरेश रैनाने भारतासाठी ७८ टी२० सामने खेळले आहे, त्यात त्यानी एक शतक आणि ५ अर्धशतकांच्या जोरावर १६०५ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
निलंबन झालेल्या ओली रॉबिन्सनचा ‘मोठा’ निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला ब्रेक
एमएस धोनीजवळ इतक्या बाईक्स आहेत, त्याला स्वत:लाही आकडा सांगता येत नाही, भारतीय क्रिकेटरचा खुलासा
टीम इंडिया सावधान, न्यूझीलंडची ‘ही’ गोष्ट ठरु शकते घातक, माजी भारतीय दिग्गजाचा इशारा





