गुरुवार रोजी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीगमधून मोठी बातमी पुढे आली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीचा कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार केला आहे. त्याने ही जबाबदारी संघातील अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्याकडे सोपवली आहे. यानंतर क्रिकेटजगतातून सीएसकेचा नवा कर्णधार जडेजावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) यानेही नव्या कर्णधाराचे (CSK New Captain) अभिनंदन केले आहे. मात्र यावेळी त्याने त्याचा जवळचा मित्र आणि जुना संघ सहकारी धोनीबाबत असे काही केले आहे, ज्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला नवल वाटले असावे.
आयपीएलप्रेमींमध्ये ‘चिन्नाथाला’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रैनाने जडेजाला त्याच्या नव्या इनिंगसाठी ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्याने लिहिले आहे की, “माझ्या भावासाठी (जडेजा) मला खूप आनंद वाटला. आम्ही दोघेही ज्या फ्रँचायझीमध्ये खेळाडू म्हणून मोठे झालो, त्या फ्रँचायझीची कमान सांभाळण्यासाठी मी जडेजाच्या नावापेक्षा अजून चांगल्या नावाचा विचार करू शकत नाही. हा एक रोमांचक टप्पा आहे आणि मला खात्री आहे की तू सर्व अपेक्षांवर खरा उतरशील.”
आश्चर्याची बाब म्हणजे, जडेजाला त्याच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देताना रैनाने कुठेही धोनीचा उल्लेख (Raina Ignored Dhoni)केलेला नाही. अगदी त्याने ट्वीटमध्ये हॅशटॅग्ज देतानाही त्यात धोनीचा संदर्भ घेतलेला नाही. यावरून आयपीएलप्रेमी रैना, थाला अर्थात धोनीवर रुसला की काय, असे अंदाज लावत आहेत.
Absolutely thrilled for my brother. I can't think of anyone better to take over the reins of a franchise we both had grown up in. All the best @imjadeja . It's an exciting phase and I'm sure you will live up to all the expectations and love #yellow #csk #WhistlePodu
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 24, 2022
धोनीने रैनावर केले होते दुर्लक्ष
रैना २००८ पासून धोनीसोबत आयपीएलमध्ये खेळला आहे. धोनी सीएसकेचा कर्णधार असताना बरीच वर्षे रैनाने उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच धोनीच्या अनुपस्थित रैनाने सीएसकेचे नेतृत्त्वही केले होते. इतकेच नव्हे तर, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यादिवशीच रैनानेही निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र अगदी जवळचा मित्र असलेल्या धोनीनेच आयपीएल २०२२ साठीच्या मेगा लिलावात रैनावर दुर्लक्ष केले आहे.
सुरुवातीला सीएसकेने रैनाला रिटेन केले नव्हते. त्यानंतर मेगा लिलावात तरी हा संघ रैनाला विकत घेईल असे वाटत असताना त्याच्यावर धोनीच्या संघाने बोलीही लावली नाही. त्यामुळे रैना यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिला आहे. कदाचित याचाच राग रैनाच्या मनात असावा, म्हणून त्याने जडेजाला शुभेच्छा देताना कुठेही धोनीचा उल्लेख केलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
थलायवन इरुकिंद्रन! सीएसकेच्या नव्या कर्णधाराची आली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला जडेजा
‘जड्डू’च का? चेन्नईने धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाला निवडण्याचे ‘हे’ आहे खास कारण