Suresh Raina On MS Dhoni: भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी धोनीला हा सन्मान मिळाला आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज धोनीचे हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. दरम्यान, सुरेश रैनाने धोनीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेशाबद्दल एक खास मॅसेज शेअर केला आहे.
हॉल ऑफ फेममध्ये धोनीच्या समावेशाबद्दल रैना म्हणाला, “या दिग्गजाने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये प्रवेश केला आहे. धोनीच्या शानदार कारकिर्दीमुळे आणि क्रिकेटमधील योगदानामुळे त्याला हॉल ऑफ फेममध्ये योग्य स्थान मिळाले आहे. जबरदस्त कामगिरीपासून ते खेळ बदलणाऱ्या नेतृत्वापर्यंत, धोनी भाईने खेळावर एक वेगळी छाप सोडली आहे. त्याचा शांत स्वभाव, तीक्ष्ण प्रवृत्ती आणि अटल वचनबद्धता लाखो लोकांना प्रेरणा देते. खेळाचा एक खरा आयकॉन आणि दिग्गज, त्याचा वारसा क्रिकेटपटूंच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 3 वर्षांनंतर धोनीला भारतीय टी20 संघाचे नेतृत्व मिळाले. धोनीने भारतीय संघासाठी 2007 चा टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर, धोनीने 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताला वनडे विश्वचषक जिंकून दिला. भारतीय कर्णधार म्हणून 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर, 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली धोनीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला. धोनीने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (India won 3 ICC trophies under Dhoni’s leadership)





