भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना सध्या चर्चेत आहे. कारण आहे रैनाचे नवीन रेस्टोरंट, जे त्याने एम्टरडॅममध्ये (नेदरलंड) सुरू केले आहे. सोशल मीडियावर कुकिंग करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअरणाऱ्या रैनासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासाखेच आहे. रैनाच्या रेस्टोरंटमध्ये सर्व पदार्थ हे भारतीय मिळणार आहेत.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सुरेश रैना () याने आपल्या या नवीन रेस्टोरंटची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. ही पोस्ट शेअर करताना रैना म्हणाला की, “मला नेहमीच क्रिकेट आणि जेवण या दोन्ही गोष्टींची आवड राहिली आहे. रैना इंडियन रेस्टोरंट सुरू करणे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.” रैना स्वतः आफल्या या नवीन रेस्टोरंटमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला या नवीन व्यावसायासाठी शुभेच्छा मिळत आहेत. अनेकजन रैनाला शेफच्या रुपात पाहून वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
https://www.instagram.com/p/Ct00fvoInf8/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MTI1ZDU5ODQ3Yw==
दरम्यान, सुरेश रैना एमएस धोनी याचा चांगला मित्र आहे. दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला होता. एमएस धोनी 15 ऑगस्ट 2020 मध्ये अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. धोनीच्या निवृत्तीची माहिती मिळताच सुरैश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. रैना आणि धोनी त्यानंतर काही वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी एकत्र खेळले. पण मागच्या काही हंगामांमध्ये रैनाने सीएसकेची साथ सोडली. आयपीएल लिलावात देखील सीएसकने रैनासाठी बोली लावली नाही.
रैनाच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅठमधून अनुक्रमे 768, 5615 आणि 1604 धावा निघाल्या आहेत. आयपीएलमध्ये रैनाने 205 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5528 धावा त्याने केल्या. रैना सध्या भारत किंवा सीएसकेसाठी खेळत नाहीये. पण क्रिकेटच्या मैदानात आजही दिसतो. अलिकडच्या काळात त्याने समालोचनाला सुरुवात केली आहे. (Suresh Raina has launched a new restaurant in Amsterdam)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय वेगवान माऱ्यात आणखी एक भरती! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी
बीसीसीआयच्या वर्ल्डकप प्लॅनमध्ये संजूही! वेस्ट इंडीजविरूद्ध वनडे संघात केला समावेश