भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाला वाटते की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आगामी टी-२० मालिका भारतीय खेळाडूंसाठी महत्वाची असणार आहे. खासकरून त्या खेळाडूंसाठी ही मालिका जास्त महत्वाची असेल, ज्यांनी आयपीएल २०२२मध्ये चांगेल प्रदर्शन केले आहे. रैनाच्या मते कर्णधार केएल राहुलवर देखील या मालिकेदरम्यान सर्वाचे लक्ष असेल.
सुरेश रैनाने आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेला महत्वाचे म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला की, “हे खूप महत्वापूर्ण आहे, कारण तुम्हाला आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना पाहायला मिळणार आहे. ते भारतासाठी कसे प्रदर्शन करतात, हे महत्वाचे असेल. जर तुम्हाला भारतासाठी खेळायचे असेल, तर मानसिकता महत्वपूर्ण आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. रैनाला वाटते की, मालिकेत राहुलच्या नेतृत्वावर देखील सर्वाचे लक्ष असेल. तो म्हणाला की, “जेव्हा सामना असेल, तेव्हा वातावरण देखील खूप गरम असेल. सामने जून महिन्यात खेळले जाणार आहेत. पाहण्यासाठी खूप गोष्टी आहेत. उमरान जो एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. अर्शदीप, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे आणि केएल राहुल कर्णधाराच्या रूपात कसे प्रदर्शन करतो, हे देखील पाहावे लागेल. राहुलने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वामुळे खूप प्रभावित केले आहे, पण आता भारतीय संघाची वेळ आहे. मला वाटते की, तो खूप चांगले प्रदर्शन करेल.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मासोबतच विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी विश्रांती दिली गेली आहे. याच कारणास्तव राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी दिली गेली आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याने यावर्षी आयपीएलमध्ये जोरदार प्रदर्शन करून दाखवले. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘सावधान, आम्ही येतोय!’ मालिकेपूर्वी वेस्टइंडिजच्या कर्णधाराचा पाकिस्तान संघाला इशारा
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
हे फक्त माहीच करू शकतो! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोनीचा पुढाकार, लढवली भन्नाट शक्कल