भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला आजही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक समजले जाते. त्याने भारतीय संघाकडून खेळताना मैदानात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीपाठोपाठ शनिवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनानिमित्त निवृत्ती जाहीर केली होती. परंतु असे असले तरी हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. निवृत्तीनंतर क्रिकबझशी चर्चा करताना रैनाला कठीण स्थानांवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी ५ सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची निवड करण्यास सांगितले होते.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता रैना
भारतीय क्रिकेट संघात अनेक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. त्यात विराट कोहली, मनीष पांडे, रवींद्र जडेजा आणि बऱ्याच खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षणाने विरोधी संघाच्या फलंदाजांना नेहमीच चिंतेत टाकतात. भारतीय ताफ्यात क्षेत्ररक्षणाची खरी सुरुवात एकनाथ सोलकर यांच्यापासून झाली. हा वारसा पुढे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफपासून आणि त्यानंतर सुरेश रैनाने पुढे चालविला. रैना आपल्या फलंदाजीप्रमाणेच दिग्गज क्षेत्ररक्षकही होता.
रैनाला सांगितले ५ सर्वोत्तम क्षेत्ररक्षक निवडण्यास
निवृत्तीनंतर क्रिकबझशी चर्चा करताना रैनाला १० क्रिकेटपटू आणि ५ क्षेत्ररक्षणाच्या स्थानांची यादी देण्यात आली. त्याला विशेष स्थानासाठी ५ सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांची निवड करण्यास सांगितले होते. हा निश्चितच एक कठीण प्रश्न होता. परंतु रैनाने आपल्या कारकिर्दीप्रमाणे, हे आव्हानदेखील पार केले. त्याने जाँटी ऱ्होड्सला बॅकवर्ड पॉईंटवर क्षेत्ररक्षणासाठी निवडले, जे निश्चितच महत्त्वपूर्ण आणि कठीण स्थानांपैकी एक आहे.
क्षेत्ररक्षण स्थानानुसार सर्वोत्तम क्षेत्ररक्षक
सुरेश रैनाने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मिड विकेटसाठी, तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्सला कव्हरवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी निवडले. डिविलियर्स फलंदाजीव्यतिरिक्त मैदानातील धडाकेबाज क्षेत्ररक्षक होता. आधुनिक काळातील क्रिकेटमध्ये सर्वात चांगला क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाला रैनाने मिड- ऑफ स्थानासाठी निवडले, तर युवराज सिंगला मिड- ऑनच्या स्थानासाठी निवडले.
विराट कोहली, हर्षल गिब्ज यांसारखे धुरंदर खेळाडू यादीतून बाहेर
युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीत मैदान गाजवलं. तो मैदानावर योग्य वेळेत थेट थ्रो करायचा. रैना, पाँटिंग मिड विकेटवर क्षेत्ररक्षण करायचे आणि ते सिंगल स्टंपदेखील अनेकवेळा हिट करायचे.
विराट कोहली, हर्षल गिब्ज, पॉल कॉलिंगवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्टिन गप्टील हे खेळाडू क्षेत्ररक्षणातील दिग्गज खेळाडू असूनही या यादीतून बाहेर आहेत.
सुरेश रैनाने निवडलेले क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या स्थानांची अशी आहे संपूर्ण यादी
बॅकवर्ड पाँईंट- जाँटी ऱ्होड्स
कव्हर- एबी डिविलियर्स
मिड- ऑन- युवराज सिंग
मिड- ऑफ- रवींद्र जडेजा
मिड- विकेट- रिकी पाँटिंग
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमध्ये चुकीच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला केकेआरचा कर्णधार म्हणतो योग्य, पण…
-चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक
-राजवाड्यासारखे आहे रैनाचे घर, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
ट्रेंडिंग लेख-
-सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता
-‘या’ ५ क्रिकेटर्सच्या नावाची गंमतच वेगळी, मोठ्या शहरांची आणि यांची नावं आहेत सारखी
-मुंबईकरां शिवाय टीम इंडियाचं ‘पान’ही हलत नाही, जाणून घ्या काय आहे कारण