लवकरच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी आयपीएल संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघ देखील यूएईला रवाना झाला आहे. यादरम्यान सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संघाची जोरदार तयारी चालू आहे.
तसेच धोनी आणि सुरेश रैना हे क्रिकेटमधील जय वीरू समजले जातात. हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत, हे वेगळे सांगायला नकोच. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा झाली आहे. जेव्हा रैनाला देशाचा पंतप्रधान म्हणून सचिन तेंडुलकर आणि धोनी यांच्यात कोणाला निवडशील असे विचारले असता, रैनाने धोनीचे नाव घेतले.
सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी खूप काळापासून संघ सहकारी असून मैदानाबाहेरही चांगले मित्र देखील राहिले आहेत. तसेच दोघेही सीएसके संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून खेळत आहेत.
नुकताच एका कार्यक्रमात रेडियो जॉकी रोनकच्या एका यूट्यूब चैनलवर रैनाला एक असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “तू देशाचा पंतप्रधान म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात कोणाला निवडशील.” यावर सहाजिकच रैनाने महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले. यावरून रैना आणि धोनी यांच्यातील असलेल्या घट्ट मैत्रीचे दर्शन घडून येते.
धोनी आणि सुरेश रैना यांच्यातील मैत्रीचे संबंध खूप घट्ट मानले जाते. दोघांनीही २००५ सालापासून अनेक सामन्यांमध्ये एकसाथ मिळून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दोघांनीही नुकतेच मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२० ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
दरम्यान, दोघेही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाचा भाग आहेत. आयपीएलमध्ये पहिल्या टप्प्यात खेळविण्यात आलेल्या सामन्यांमध्ये, धोनीचा सीएसके संघ १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेने आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या १४ व्या हंगामाची चांगली सुरुवात केली होती.
सध्या सीएसकेचा संघामध्ये पोहोचला असून, येथे सर्व खेळाडूंच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे. सीएसकेने आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–ओमानमधील मैदानं गाजवल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला, ‘सचिन सरांमुळे मदत झाली, ते माझा खेळ जाणून आहेत’
–टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत कर्णधार बाबार आझमची नाराजी? पीसीबीने दिले उत्तर
–‘ज्यांना वर्षानुवर्षे हरवलं, त्यांच्यासमोर करावा लागतोय संघर्ष’, माजी इंग्लिश कर्णधाराचा घरचा आहेर