---Advertisement---

भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…

On: शुक्रवार, सप्टेंबर 4, 2020 5:55 PM
---Advertisement---

मुंबई । आयपीएल सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना भारतात परत आल्यापासून मोठा वाद झाला आहे.  संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या वादग्रस्त विधानानंतर असे मानले जात होते की, चेन्नई सुपर किंग्ज आणि सुरेश रैना यांच्यात सर्व काही ठीक नाही. आता असे वृत्त समोर आले आहे की, सीएसकेने रैनाला संघाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले आहे.

काही दिवसापूर्वी अशा बातम्या आल्या की, सीएसकेचा गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.  यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी रैना 30 ऑगस्ट रोजी वैयक्तिक कारण असल्याचे सांगत भारतात परतला. हॉटेलमधील त्याला मिळालेल्या खोलीबद्दल रैना नाराज असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रैनाने परतल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याला टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले.  सूत्रांच्या माहितीनुसार,  ‘ज्या दिवशी तो परत गेला त्या दिवशीच्या दुसर्‍या दिवशी सीएसके गटातून त्याला बाहेर काढले गेले. तो आता संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संघात परतण्याविषयी बोलत आहे.

सुरेश रैनाच्या परतण्यावर अजूनही प्रश्न कायम

चेन्नई सुपर किंग्जने मात्र रैनाच्या जागी अद्याप कोणालाही आमंत्रित केलेले नाही. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणत अाहेत की, कर्णधार धोनी, कोच फ्लेमिंग सध्याच्या संघाशी समाधानी आहे आणि त्यांनी नव्या खेळाडूची मागणी केली नाही.

काशी विश्वनाथनला रैनाच्या फ्रँचायझीच्या भविष्याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, संघ सर्व खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतो.  ते म्हणाले, ‘रैनाने अाम्हांला सांगितले की या हंगामासाठी तो उपलब्ध नाही. आम्ही आमच्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा देत असतो. त्यांचे काही वैयक्तिक मुद्दे चालू आहेत. जेव्हा तो तंदुरुस्त आणि तयार असेल तो परत येऊ शकतो. हेच आपल्यालाही हवे आहे.” प्रसार माध्यामांच्या माहितीनुसार, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला देखील आयपीएल 2020 मध्ये सुरेश रैना परत येऊ शकेल अशी आशा आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---