आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल याची बॅट आग ओकतेय. त्याने साखळी फेरीतील १० सामन्यांमध्येच ४५० धावांचा आकडा ओलांडला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याचे असे म्हणणे आहे की, राहुलचे शानदार शॉट हे सिद्ध करतात की, तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’वरील क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात बोलताना रैनाने (Suresh Raina) राहुलवर (KL Rahul) स्तुतीसुमने उधळली आहेत. राहुल म्हणाला की, “राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट काळातून जात आहे. तो खूप सकारात्मक मानसिकतेसह फलंदाजी करत आहे. तो काही शानदार फटके खेळत आहे, जे सिद्ध करतात की की तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ काळातून जात आहे. तो या हंगामात काही नव्या गोष्टी आजमावत आहे. त्याला अशाप्रकारची फलंदाजी करताना पाहाणे खरोखरच खूप प्रशंसनीय (Suresh Raina Praised KL Rahul) आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रैनाच्या प्रतिक्रियेला संमती दर्शवत माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनीही राहुलबद्दल आपले मत मांडले आहे. राहुल डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फटके खेळण्यास सक्षम आहे. परंतु सोबतच तो त्याच्या प्रवृत्तीवर अंकुशही ठेवतो आहे. जेणेकरून हे सुनिश्चित होईल की, तो आयपीएल २०२२मध्ये लखनऊसाठी मोठ्या आणि प्रभावशाली खेळी खेळू शकेल.
राहुलबद्दल बोलताना कैफ (Mohammad Kaif) म्हणाले की, “राहुल यावर्षी कर्णधार खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. वो सुरुवातीपासूनच आक्रमक होऊ शकतो आणि तो त्याच्या खेळीची सुरुवात षटकारासह करण्यास सक्षम आहे. परंतु तो मोठ्या आणि प्रभावशाली खेळी केळण्याच्या आपल्या प्रवृत्तीवर अंकुश लावत आहे.”
दरम्यान राहुलच्या या हंगामातील आतापर्यंतच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने १० सामने खेळताना ५६.३८च्या सरासरीने ४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि २ अर्धशतके निघाली आहेत. तो सध्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जोस बटलर त्याच्यापुढे असून तो सर्वाधिक ६१८ धावांसह अव्वलस्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उलट्या दिशेने धावताना बटलरने हवेत झेपावत चक्क एका हाताने घेतला कॅच, फलंदाजानेही धरलं डोकं
शुबमनची भलतीच अंधश्रद्धा! जास्त धावा करता याव्या म्हणून ‘या’ अनुभवी खेळाडूच्या बॅटचा करायचा वापर