आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असणाऱ्या आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला (Suresh Raina) २०२२ च्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Mega auction) कोणत्याच फ्रॅंचायझीने खरेदी केले नाही. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात सुरेश रैना खेळताना दिसणार नाहीये. लिलावात कोणत्याच संघाने बोली न लावल्याने सीएसकेचा (CSK) माजी खेळाडू सुरेश रैनाने बीसीसीआयकडे दाद मागितली आहे. जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत, ज्यांना आयपीएलमध्येही विकत घेतले गेले नाही, अशा खेळाडूंना बीसीसीआयने बाहेरील लीग खेळण्याची परवानगी द्यावी, असे रैनाने म्हटले आहे.
रैना म्हणाला की, “आम्हाला वाटेल तेथे आम्ही खेळू असे बीसीसीआयने स्वतः सांगावे. तुम्ही आयपीएल आणि बीसीसीआयमध्ये नसतानाही आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही. आजकाल देशांतर्गत क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा सुरु आहे. आम्ही तीन महिने दर्जेदार क्रिकेट खेळू, मग ती सीपीएल असो किंवा बीबीएल असो. आम्ही तयार आहोत. बाहेरचे सगळे खेळाडू खेळतात. त्यानंतर खेळाडू आपल्या देशासाठी पुनरागमन करतात. त्यांनी ४०-५० मुलांचा पूल बनवला आहे. त्यांना वाटते की तो खराब झाला आहे. नाहीतर ते नकार देतात. आमच्याकडे दुसरी कोणतीही योजना नाही. आम्ही बाहेर जाऊ, मग परफॉर्म करू, तंदुरुस्त राहू आणि आम्हाला चांगले शिकायला मिळेल.”
Please @ImRo45 consider #SureshRaina for #MumbaiIndians team.🙏🇮🇳💙💙#Boycott_ChennaiSuperKings pic.twitter.com/yiCiZX0gbc
— Jyoti Suman (@Jas23478675) February 15, 2022
आयपीएल २०२२ च्या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले आहे. इशान किशनवर या लिलावात सर्वात जास्त बोली लागली. आयपीएल २०२२ मध्ये सर्व फ्रँचायझीनी खेळाडूंवर खुलेपणाने प्रचंड पैसे खर्च केले. आयपीएलसाठी १० संघांनी २०३ खेळाडू खरेदी केले. यामध्ये ६६ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मेगा लिलावात सर्व संघांनी एकूण ५ अब्ज ४९ कोटी ७० लाख रुपये खर्च केले आहेत.
मेगा लिलावादरम्यान सर्वात मोठे आश्चर्य तेव्हा वाटले, जेव्हा सुरेश रैनाचे नाव समोर येवून देखील त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. माजी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात २०५ सामन्यांमध्ये १३६.७६ च्या स्ट्राइक रेटने ५५२८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने सर्वात जास्त ६२८३ धावा, शिखर धवनने ५७८४ आणि रोहित शर्माने ५६११ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये धावा करण्याच्या बाबतीत रैना चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ टी२०मध्ये व्हाईटवॉशचा ‘मास्टर’! कर्णधार रोहितची ‘ही’ आकडेवारी पाहून बसेल विश्वास
आयपीएमधून बीसीसीआयला मिळणार ५०० अब्ज रुपये? मोठ-मोठ्या कंपन्या शर्यतीत
व्यंकटेशच्या रूपात भारताला मिळाला टी२०चा ‘नवा फिनिशर’, हार्दिकसाठी बंद झाले पुनरागमनाचे रस्ते?