सध्या यूएस मास्टर्स टी10 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू खेळताना दिसत आहे. शनिवारी उपांती सामना खेळला गेला. दरम्यान न्यूयॉर्क वॉरियर्स आणि टेक्सास चार्जर्स यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना कॅलिफोर्निया नाईट्स संघाचा कर्णधार आहे. कॅलिफोर्निया नाईट्स संघ सलग दोन पराभावानंतर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पहिल्या उपांत्यपूर्वी सामन्यात कॅलिफोर्निया नाईट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकात 4 गडी गमावून 96 धावा केल्या. ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने 22 चेंडूत 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर कर्णधार सुरेश रैना (Suresh Raina) ला केवळ 2 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूयॉर्क वॉरियर्सने 8.4 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. रिचर्ड लेव्हीने 24 चेंडूत नाबाद 47 आणि कर्णधार मिसबाह उल हक याने 13 चेंडूत 29 धावा करत संघाला अंतिम फेरीत नेले.
एलिमेलेटर सामन्यात मॉरिसविले युनिटी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 5 गडी गमावून 115 धावा केल्या. ओबुस पिनारने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. थिसारा परेराने शानदार गोलंदाजी करत अवघ्या 17 धावांत 4 बळी घेतले. टेक्सास चार्जर्सने हे लक्ष्य 8.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. मुख्तार अहमदने 24 चेंडूत 47 आणि मोहम्मद हाफिजने 22 चेंडूत 57 धावा केल्या.
जॅक कॅलिसची तुफानी खेळी गेली वाया
दुसऱ्या उपांत्यपूर्वी सामन्यात कॅलिफोर्निया नाईट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 गडी गमावून 139 धावा केल्या. जॅक कॅलिसने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. मिलिंद कुमारनेही 19 चेंडूत 41 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल टेक्सासने हे लक्ष्य ८.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. मोहम्मद हाफिजने 24 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. (suresh raina team out of tournament)
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या खेळाडूबाबत धक्कादायक ब्रेकिंग! स्टार फलंदाज नाही घेणार श्रीलंकेसाठी भरारी, पण का?
हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर