इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे आयोजन यूएईत केले गेले आहे. आयपीएलसाठी काही संघ त्यांच्या खेळाडूंसह यूएईत दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवातही केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघ, चेन्नई सुपर किंग्जही १३ ऑगस्टला यूएईत दाखल झाला आहे. दरम्यान अलीकडच्या काळात संघातील खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशातच आता चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि संघाचा गोलंदाज केएम आसिफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे.
यूएईत आयपीएल सुरू होण्यास आणखी बराच कालावधी आहे. तोपर्यंत खेळाडू सरावासह एकमेकांसोबत मजा-मस्ती करतानाही दिसत आहेत. दिग्गज फलंदाज सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज केएम आसिफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत असून हा व्हिडिओ स्वत: सुरेश रैनाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/reel/CTNWoGJBQYS/?utm_source=ig_web_button_share_sheet
व्हिडोओत दिसत आहे की, दोघे मजा-मस्ती करताना स्विमिंग पूलमध्ये पडतात. हा व्हिडिओ डब्ल्यूडब्ल्यूईचा सुप्रसिद्ध खेळाडू जाॅन सीनाच्या गाण्यावर चित्रित केला गेला आहे. व्हिडिओत रैना जाॅन सिनाची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, सुरेश रैनाने गोलंदाज केएम आसिफला जाॅन सीनाच्या खास शैलीमध्ये स्पिमिंग पूलमध्ये फेकले आहे.
आयपीएलच्या या १४ व्या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. हंगामातील आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आधारे संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यूएईतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भांडं फुटलं! धोनीचा हुकुमी एक्का ‘या’ कलाकाराच्या बहिणीला करतोय डेट, सर्वत्र रंगली एकच चर्चा
‘धोनी, तेव्हा तू माझ्या खिशात होतास, मी नव्हे’; पीटरसनने सांगितली ओव्हल कसोटीतील जुनी आठवण
कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम






