भुवनेश्वर । भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम पार पडलेल्या भारत विरुद्ध जर्मनी यांच्यातील हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात जर्मनीने २-० अशी मात केली.
हॉकी वर्ल्ड लीग फायनलमधील एकूण तीन साखळी सामन्यांपैकी दोन सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. आस्ट्रेलिया विरुद्धच्या सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. परंतु भारताला साखळी फेरीत एकही विजय मिळवता आला नाही.
https://www.facebook.com/TheHockeyIndia/photos/a.258226570956583.53077.257841377661769/1440043916108170/?type=3&theater
ब गटातील जर्मनी विरुद्ध झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा ढिसाळ खेळाचे प्रदर्शन क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाले. ‘बॅक-अप ‘चा अभाव, कमकुवत बचाव हे खराब कामगिरीला कारणीभूत ठरले. दोन ‘पेनल्टी कॉर्नर’ मिळून देखील भारताला त्याचा फायदा घेता आलेला नाही. जर्मनीने पहिल्या वीस मिनिटातच आपले दोन्हीही गोल नोंदवून आपला दबदबा कायम ठेवला. कर्णधार मार्टिन हनेर व मॅट ग्रॅम्सबुच यांच्या प्रत्येकी एक-एक गोलने जर्मनीचा विजय सुखर केला.
जर्मनीने दोन विजयासह गट ब मध्ये अग्रस्थानी कायम असून इंग्लंड दुसऱ्या. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर भारत चौथ्या स्थानी आहे.