मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत शेवटपर्यंत झुंज दिली, पण त्यांचे सहावी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स संघाने मुंबईला 62 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात मुंबईसाठी सूर्यकुमार यादव याने 38 चेंडूत सर्वाधिक 61 धावांची खेळी साकारली. मात्र, त्याची विकेट पडताच मुंबईच्या आशाही धुळीस मिळाल्या. अशात आता गुजरातविरुद्धच्या दारुण पराभवानंतर सूर्यकुमारने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सूर्यकुमार यादव ट्वीट
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने ट्वीट करत लिहिले की, “आम्ही मान उंच करून आयपीएलच्या या हंगामातून बाहेर होत आहोत. आम्ही या हंगामात पुनरागमन केले, हा खूपच चढ-उतार असणारा हंगाम राहिला आहे. हा संघ, हा हंगाम आणि हे नाते खूपच खास आहे. हे सर्व माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आम्ही मजबूतीने पुनरागमन करू. आम्हाला नेहमी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.”
We bow out of this IPL season with our heads held high. A season of come backs, filled with more ups than downs.
This team, this season, these bonds will remain very special and very close to my heart.
???????? ???????????????? ???????? ???????????????? ????????????????????????????????????Thank you for always having… pic.twitter.com/ADCreezUhx
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) May 27, 2023
क्वालिफायर 2 सामन्याचा आढावा
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना (Second Qualifier Match) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने आपल्या खिशात घातला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून शुबमन गिल याने 60 चेंडूत 129 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईपुढे 3 विकेट्स गमावत 234 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना खरा सुरुवात करूनही मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. एकेवेळी 14 षटकात 4 विकेट्स गमावत मुंबईने 149 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार खेळपट्टीवर होता तोपर्यंत मुंबईच्या आशा कायम होत्या. मात्र, 15व्या षटकात मोहित शर्मा (Mohit Sharma) याने सूर्यकुमार आणि विष्णू विनोद (Vishnu Vinod) यांची विकेट काढत मुंबईला सामन्यापासून दूर केले. मुंबईचा डाव 18.2 षटकात 171 धावांवर संपुष्टात आला.
सूर्यकुमार यादवचे प्रदर्शन
सूर्यकुमारच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर आयपीएल 2023 स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात तो फ्लॉप राहिला होता. मात्र, त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. त्याने या हंगामात एक शतक आणि 5 अर्धशतक झळकावले. त्याने 16 सामन्यात 43.21च्या सरासरीने 181.14च्या स्ट्राईक रेटने 605 धावा केल्या. तो मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. (surya kumar yadav aka sky emotional post after mumbai indians exit ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ये ब्रोमान्स है! फायनलमध्ये पोहोचताच गिलला किस करण्यासाठी धावला मिलर, पंड्यानेही लावला नंबर; Photo
शतक ठोकल्यानंतर सचिनला भेटला शुबमन, मास्टर ब्लास्टरने हळूच कानात काय सांगितलं? पाहा फोटो