मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 5 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने सामन्यात शानदार सुरुवात केली आणि 20 षटकात 5 विकेट गमावून 195 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 80 आणि सूर्यकुमार यादवने 42 धावा केल्या. दरम्यान, सूर्यकुमार यादवनेही मोठा विक्रम केला आहे.
केकेआरविरुद्ध शानदार फलंदाजी करून सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान 1 हजार धावा करणारा तिसरा खेळाडू म्हणून विक्रम नोंदविला आहे. सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 32 डावांमध्ये 1 हजार धावा करण्याची कामगिरी केली. तसेच मुंबई इंडियन्सकडून 1 हजार धावा करणारा तो सातवा खेळाडूही ठरला आहे.
त्याच्याआधी रोहित शर्मा(३८२०), कायरन पोलार्ड(२७८६),अंबाती रायुडु(२४१६), सचिन तेंडुलकर(२३३४), हार्दिक पंड्या(११००) आणि लेंडल सिमन्स(१०७९) यांनी मुंबई इंडियन्ससाठी १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो केकेआरचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरविरुद्ध सलग चार चौकार मारताना दिसत आहे. सलामीवीर क्विंटन डिकॉक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासह डावाची धुरा सांभाळली. त्याने संदीप वॉरियरविरुद्ध एका षटकातील शेवटच्या चार चेंडूंमध्ये सलग चार चौकार मारत जोरदार फलंदाजी केली.
https://twitter.com/ipl2020highlite/status/1308795943437963265
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक हुकले असले, तरी त्याने 28 चेंडूत 47 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि एका षटकार ठोकला. सुनील नरेन आणि ओएन मॉर्गन यांनी त्याला धाबबाद केले. हा सामना मुंबई इंडियन्सने 49 धावांनी विजय मिळवला.