भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधाराच्या भूमिकात खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव याने खास कामगिरी केली. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने मंगळवारी (12 डिसेंबर) या सामन्यात मैलाचा दगड पार केला.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात 36 चेंडूत 56 धावांची खेळी करू शकला. संघासाठी त्याचे हे अर्धशतक महत्वाचे ठरलेच, पण कर्णधाराने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या. अवघ्या 56 डावांमध्ये त्याने आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. डावांच्या बाबतीत त्याने विराट कोहली याच्यासोबत संयुक्तरित्या सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यादीत दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल (58 डाव) आणि रोहित शर्मा (77 डाव) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात कमी डावात 2000 धावा करणारे खेळाडू
56 – सूर्यकुमार यादव*
56 – विराट कोहली
58 – केएल राहुल
77 – रोहित शर्मा
भारतासाठी सूर्यकुमारने सर्वात कमी डावांमध्ये 2000 टी-20 धावा केल्या. पण जागतिक पातळीवर विचार केला, तर हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या नावावर आहे. बाबारने अवघ्या 52 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. चेंडूच्या बाबतीत मात्र सूर्यकुमार बाबरवर देखील भारी पडला आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारे फलंदाज
52 – बाबर आझम
56 – सूर्यकुमार यादव
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात कमी चेंडूत 2000 धावा करणारे फलंदाज
1164 – सूर्यकुमार यादव
1544 – बाबर आझम
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका – मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, ऍडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, अँडीले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.
(Suryakumar scored Fastest 2000 runs in t20i by innings for India )
महत्वाच्या बातम्या –
उध्वस्थ व्हाल! भारत दौऱ्यावर इंग्लंडने करू नये ‘ही’ चूक, माजी दिग्गजाचा थेट इशारा
मोठी बातमी! आयसीसी 2024 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, महाराष्ट्राच्या दोघांना संधी