भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 9 बाद 385 धावा धावफलकावर लावल्या. मात्र, या सर्वांमध्ये टी20 फलंदाजी क्रमवारी पहिल्या स्थानी असलेला सूर्यकुमार यादव हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे.
इंदोर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने वनडे शतकांचा मोठा दुष्काळ संपवत शतक साजरे केले. तर, गिलने आपला लाजवाब फॉर्म कायम राखत मागील चार सामन्यातील तिसरे शतक झळकावले. त्यानंतर हार्दिक पंड्याने ठोकलेल्या अर्धशतकामूळे भारतीय संघ 385 पर्यंत मजल मारू शकला. परंतु, सूर्यकुमार यादव याची बॅट या सामन्यात पुन्हा शांत राहिली. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत वनडे संघातील जागा मजबूत करण्याची संधी त्याच्याकडे होती. मात्र, या सामन्यात तो 9 चेंडू खेळत 14 धावांवर माघारी परतला.
टी20 क्रिकेटमध्ये सध्या सर्वोत्तम फलंदाज असलेला सूर्यकुमार वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय. जानेवारी 2022 मध्ये वनडे पदार्पण केलेल्या सूर्यकुमारने पहिल्या सहा सामन्यात 2 अर्धशतके व 4 वेळा 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. त्यानंतर मात्र त्याचा फॉर्म वनडे क्रिकेटमध्ये चांगलाच गडगडला आहे.
पुढील 14 पैकी 9 सामन्यात तो 20 पेक्षा जास्त धावा काढू शकला नाही. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 34 राहिली. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 20 सामन्यात 28.86 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये अजूनही अडखळत असलेला सूर्यकुमार टी20 क्रिकेटमध्ये मात्र सुसाट धावताना दिसतोय. त्याने आत्तापर्यंत 45 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 46.41 च्या सरासरीने व 180 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1578 धावा कुटल्या आहेत. यात 3 शतकांचाही समावेश आहे. मागील बऱ्याच काळापासून तो टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान आहे.
(Suryakumar Yadav again flop In ODI Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
यत्र तत्र सर्वत्र शुबमन गिल! 2022 पासूनचे आकडे पाहून नक्कीच वाटेल अभिमान