शुक्रवारी (12 मे) मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याने वानखडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमारने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक तर 49 चेंडूत शतक पूर्ण केले. सूर्यकुमाने मुंबईसाठी नाबाद 103 धावा कुटल्या आणि संघाची धावसंख्या 218 पर्यंत पोहोचवली. मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या खेळाडूने केलेलील ही तिसरा सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांमध्ये सनथ जयसूर्या याने केली होती. आयपीएलचा पहिला हंगामा म्हणजेच 2008 साली जयसूर्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखडे स्टेडियमवर नाबाद 114 धावा ठोकल्या होत्या. ही मुंबईसाठी एकाद्या खेळाडूने केलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. मुंबईसाठी दुसरी सर्वात मोठी खेळी केली ती रोहित शर्मा याने. आयपीएल 2012मध्ये रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद 109 धावा कुटल्या होत्या. हा सामना कोलकातामध्येच खेळला गेला होता.
सूर्यकुमार यादव () शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी करताना दिसला. त्याने 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 49 चेंडूत नाबाद 103 धावा कुटल्या. मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या खेळाडूकडून केली गेलेली ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. यादीत चौथा क्रमांक महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आहे. सचिनने 2011 साली मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर कोची संघाविरुद्ध नाबाद 100 धावा कुटल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर लेन्डन सिमन्स आहे, ज्याने 2014 हंगामात पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. मोहालीमध्ये हा सामना पार पडलेला.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत मोठी खेळी करणारे फलंदाज
114* – समनथ जयसूर्या विरुद्ध सीएसके, (मुंबई, वानखडे स्टेडियम, 2008)
109* – रोहित शर्मा विरुद्ध केकेआर (कोलकाता, 2012)
103* – सूर्यकुमार यादव विरुद्ध गुजरात टायटन्स, (मुंबई, वानखडे स्टेडियम, 2023)
100* – सचिन तेंडुलकर विरुद्ध कोची टस्कर्स केरला (मुंबई, वानखडे स्टेडियम)
100* – लेन्डन सिमन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, (मोहाली, 2014)
दरम्यान, गुजरातविरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या चार फलंदाजांनी एकाच गोलंदाजाविरुद्ध विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा, ईशान किशन, नेहाल वढेरा आणि टिम डेविड हे चार फलंदाज राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आणि विकेट्स गमावून बसले. मोहीत शर्माने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या विष्णू विनोदची विकेट घेतली. (Suryakumar Yadav became the third highest individual scorer for Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत सूर्याने झळकावले IPLचे पहिले शतक, मुंबईचा स्कोर 200च्या पार
Breaking । विंडीज संघाच्या Head Coach पदी ‘या’ 2 दिग्गजांची निवड, एक तर दोन वेळचा टी20 चॅम्पियन