---Advertisement---

सूर्यकुमार पुनरागमनात सपशेल फेल, ‘गोल्डन डक’ नोंदवत रोहित-विराटच्या नकोशा यादीत सामील

Suryakumar-Yadav
---Advertisement---

आयर्लंडविरुद्ध डब्लिन येथे झालेला पहिला टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटाकांचा हा सामना १२ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ४ विकेट्स गमावत १०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९.२ षटकात हे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. मात्र या सामना विजयात भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याचा कसलाही वाटा राहिला नाही. याउलट तो स्वस्तात विकेट गमावत नकोशा यादीत सहभागी झाला आहे.

दुखापतीनंतर सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून मैदानावर पुनरागमन केले. परंतु पुनरागमनाच्या सामन्यात तो सपशेल फेल ठरला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारला आयर्लंडच्या क्रेग यंगने पहिल्या चेंडूवर पायचित केले. अशाप्रकारे सूर्यकुमारने पुनरागमनात गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर विकेट) (Suryakumar Yadav Golden Duck) नोंदवला. 

दुर्दैवी बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सूर्यकुमारचा हा पहिलाच गोल्डन डक होता. मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर १४ सामने खेळताना ४ अर्धशतकांच्या मदतीने ३५१ धावा करताना सूर्यकुमारने एकदाही पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर आपली विकेट गमावली नव्हती.

विराट-रोहितच्या नकोशा यादीत सहभागी
पुनरागमनात भोपळाही न फोडता विकेट गमावत सूर्यकुमार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नकोशा यादीतही सहभागी झाला आहे. तो रोहित (Rohit Sharma) आणि विराटनंतर (Virat Kohli) आयर्लंडविरुद्ध टी२० सामन्यात (Golden Duck Against Ireland) गोल्डन डक होणारा तिसराच भारतीय फलंदाज बनला आहे. भारतीय संघाने यापूर्वी आयर्लंडविरुद्ध केवळ ३ टी२० सामने खेळले होते. यादरम्यान भारताच्या २ दिग्गज फलंदाजांनी शून्यावर बाद होण्याची लाजिरवाणी कामगिरी केली होती. २०१८ सालच्या आयर्लंड दौऱ्यातील पहिल्या टी२० सामन्यात विराटने २ चेंडू खेळल्यानंतर शून्य धावेवर विकेट गमावली होती. तर दुसऱ्या सामन्यात रोहितही २ चेंडूंचा सामना करताना खाते न खोलता पव्हेलियनला परतला होता.

दरम्यान पहिला टी२० सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारत विरुद्ध आयर्लंड संघातील दुसरा आणि अखेरचा टी२० सामना मंगळवारी (२८ जून) खेळला जाईल. हा सामनादेखील डब्लिनच्या मैदानावरच रंगेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आठ वेगवेगळे कर्णधार होऊन गेले, पण हार्दिक पंड्याने पहिल्याच टी२०त कोणालाही न जमलेले काम केले

टीम इंडियाची विजयी सलामी! आयर्लंडला हरवत मालिकेत 1-0 ने आघाडी

हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा, थोड्याच वेळात मॅच सुरू होण्याचे संकेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---