भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत 100 च्या आत भारताचे आघाडीचे सात फलंदाज तंबूत पाठवले. यामध्ये सूर्यकुमार यादव याचा देखील समावेश होता. पुन्हा एकदा शून्यावर बाद होत त्याच्या नावे आता एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. मिचेल स्टार्कच्या चार बळींमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ 49 धावांमध्ये माघारी परतले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील पहिल्याच चेंडूवर पायचित होऊन तंबूत परतला. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर स्टार्कने त्याला पायचित पकडलेले.
सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. एका वनडे मालिकेत दोन वेळा गोल्डन डक होणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी भारताचे चार फलंदाज एकाच मालिकेत दोन शून्यावर बाद झाले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी अधिक चेंडू खेळले होते.
यापूर्वी राहुल द्रविड व सौरव गांगुली हे 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकाच वनडे मालिकेत शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर हरभजन सिंग व युवराज सिंग हे अनुक्रमे 2009 व 2013 मध्ये एकाच वनडे मालिकेत दोन वेळा खाते खोलण्यात अपयशी ठरलेले. त्यानंतर आता या यादीत सूर्यकुमारचा समावेश झाला आहे.
(Suryakumar Yadav Become First Indian Who Dismissed On Golden Duck Twice In ODI Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विशाखापट्टणममध्ये मोठी कामगिरी करणार स्टीव स्मिथ? भारताविरुद्ध मोडणार दिग्गजाचा विक्रम
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले