Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौतुकाच्या डोंगरावर पोहोचताच सुर्याच्या नावे असा भारतीय क्रिकेटपटू बनण्याचा लाजीरवाणा विक्रम

March 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Wisden India

Photo Courtesy: Twitter/Wisden India


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.‌ ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत 100 च्या आत भारताचे आघाडीचे सात फलंदाज तंबूत पाठवले. यामध्ये सूर्यकुमार यादव याचा देखील समावेश होता. पुन्हा एकदा शून्यावर बाद होत त्याच्या नावे आता एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत. मिचेल स्टार्कच्या चार बळींमुळे भारतीय संघाचे पाच फलंदाज केवळ 49 धावांमध्ये माघारी परतले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील पहिल्याच चेंडूवर पायचित होऊन तंबूत परतला. मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही पहिल्याच चेंडूवर स्टार्कने त्याला पायचित पकडलेले.

सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. एका वनडे मालिकेत दोन वेळा गोल्डन डक होणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी भारताचे चार फलंदाज एकाच मालिकेत दोन शून्यावर बाद झाले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी अधिक चेंडू खेळले होते.

यापूर्वी राहुल द्रविड व सौरव गांगुली हे 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकाच वनडे मालिकेत शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर हरभजन सिंग व युवराज सिंग हे अनुक्रमे 2009 व 2013 मध्ये एकाच वनडे मालिकेत दोन वेळा खाते खोलण्यात अपयशी ठरलेले. त्यानंतर आता या यादीत सूर्यकुमारचा समावेश झाला आहे.

(Suryakumar Yadav Become First Indian Who Dismissed On Golden Duck Twice In ODI Series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विशाखापट्टणममध्ये मोठी कामगिरी करणार स्टीव स्मिथ? भारताविरुद्ध मोडणार दिग्गजाचा विक्रम 
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले


Next Post
Rohit Sharma injured

मागील 30 वर्षात भारताकडून अशी निराशा दोनदाच! दोन्ही वेळी कॅप्टन रोहितच, कर्णधार म्हणून नावे नकोसा विक्रम

Photo Courtesy: Twitter/ICC

घरच्या मैदानावर टीम इंडियाचा नामुष्कीजनक विक्रम! भारताच्या वनडे इतिहासात चौथ्यांदाच असं घडल

Photo Courtesy: Twitter/ICC

दुसऱ्या वनडेत टीम इंडिया चारीमुंड्या चीत! ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 11 षटकात 10 विकेट्सने रेकॉर्डब्रेक विजय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143