---Advertisement---

रेकॉर्डब्रेक सूर्या! आयसीसी क्रमवारीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी, विराटला कधी जमलेच नाही

Suryakumar Yadav
---Advertisement---

एकीकडे विरोधी फलंदाजांना आपल्या वेगाने दमवणारा भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) तर दुसरीकडे विरोधी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा भारताचा धडाकेबाद फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यकुमार भारताला मिळालेला नवा टी20 स्पेशालिस्ट. त्याने 2021मध्ये भारताकडून पदार्पण केले आणि धावांचा पाऊस पाडत नवनवे किर्तीमान रचले. अशातच त्याच्या नावावर आयसीसी टी20 क्रमवारीतील मोठा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. जो आतापर्यंत विराट कोहलीला देखील जमला नाही.

सूर्यकुमार आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर तर विराजमान आहेच. आता त्याने रेटिंगमध्ये विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय टी20च्या इतिहासात आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला जे जमले नाही ते सूर्यकुमारने केले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत 900 पेक्षा अधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणारा पहिला भारतीय आणि जगातील तिसराच खेळाडू बनला आहे.

सूर्यकुमार सध्याच्या आयसीसी टी20 क्रमवारीत 908 रेटिंग पॉइंट्स पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान आहे. त्याचे 836 पॉइंट्स आहेत. यामुळे सूर्यकुमार किती पुढे आहे याचा अंदाज लागतो. त्याचबरोबर आयसीसी टी20 क्रमवारीत 900 पॉइंट्सचा आकडा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच आणि इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान यांनीच पार केला आहे. फिंचने 2018च्या जुलै महिन्यात 900 पॉइंट्सला गवसणी घातली होती. त्यानंतर मलानने 2020मध्ये 915 पॉइंट्स मिळवले होते.

सूर्यकुमारने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. 7 जानेवारीला झालेल्या सामन्यात त्याने नाबाद शतक केले होते. त्याचाच फायदा त्याला क्रमवारीत झाला. सध्या श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र या मालिकेनंतर भारत घरच्याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा चाहत्यांना सूर्यकुमारची तुफानी फलंदाजी पाहायला मिळणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धचे टी20 सामने 27 जानेवारी, 29 जानेवारी आणि एक फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत. (Suryakumar Yadav Becomes First Indian Player Who Get 900 rating points in T20I Batting Ranking)

भारतीय खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी20मधील सर्वोच्च रेटिंग-
1) सूर्यकुमार यादव – 908
2) विराट कोहली – 897
3) केएल राहुल – 854

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉनंतर अजिंक्य रहाणेची कॅप्टन्स इनिंग! निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर
काय सांगता, उमरानचा ‘तो’ चेंडू सर्वात वेगवान नव्हताच! क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरूवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---