---Advertisement---

MI vs LSG: सूर्यकुमार यादवने रचला इतिहास…! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

On: रविवार, एप्रिल 27, 2025 5:49 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 45व्या सामन्यात सूर्यकुमार यादवने इतिहास रचला. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद 4,000 धावा पूर्ण करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये 4,000 धावा पूर्ण करण्यासाठी सूर्याला 2,705 चेंडूंची गरज लागली. या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसरा फलंदाज ठरला. पण भारतीयांमध्ये तो एकमेव अव्वल स्थानावर आहे,

या वर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या 34 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला एलएसजी विरुद्ध एमआयच्या सामन्यात 4,000 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 33 धावांची आवश्यकता होती. सूर्याने आवेश खानने टाकलेल्या 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून हे 4,000 धावा पूर्ण केल्या.

आयपीएलमध्ये 4,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ख्रिस गेलला 2,653 चेंडूंची गरज लागली होती, तर एबी डिव्हिलियर्सने 4,000 धावांचा टप्पा 2,658 चेंडूत पूर्ण केला. या दोन दिग्गज फलंदाजानंतर अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव तिसरा फलंदाज ठरला. त्याने 2,714 चेंडूत 4,000 धावांचा टप्पा ओलांडला.

आयपीएलमध्ये सर्वात जलद 4,000 धावा (चेंडूंनुसार)

2,653 – ख्रिस गेल
2,658 – एबी डिव्हिलियर्स
2,705 – सूर्यकुमार यादव*
2,809 – डेव्हिड वॉर्नर
2,886 – सुरेश रैना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---