---Advertisement---

सूर्याचा ‘तो’ षटकार पाहून कॉमेंटेटर्सही झाले शॉक, पुन: पुन्हा पाहावा असा आहे

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 7:18 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

भारताने सूर्यकुमार यादवच्या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिजला पराभूत केले. सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवर खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने यजमान (WIvsIND)संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. मागील दोन सामन्यात सूर्यकुमारने निराशा केली होती. तर मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात ७६ धावांची खेळी करत त्यांने सगळ्यांची चिंता दूर केली आहे. यातील त्याने मारलेल्या एका शॉट

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सलामीला येताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याची ही जबरदस्त खेळी पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. त्याला काही उगाच मि.३६० डिग्री म्हणत नाही, याचा प्रत्यय वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना आला. तसेच त्याचे काही फटके पाहून समालोचकही आश्चर्यचकीत झाले आहेत.

सूर्यकुमारच्या बॅटमधून या सामन्यात ८ चौकार आणि ४ षटकार मारले. त्यातील अल्झारी जोसेफला मारलेला षटकार पाहून तर समालोचकही चकीत झाले आहेत. जोसेफने सूर्यकुमारला ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू फेकला, तर त्यानेही यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा शॉट (Suryakumar Yadav has lofted it through the line) खेळला आहे. त्याचा हा शॉट पाहून समालोचकही मंत्रमुग्ध झाले आहेत.

तसेच सूर्यकुमारचा हा षटकार चाहत्यांनाही आवडला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात त्याने सलामीला येताना १७२.७३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच तो आधी झालेल्या दोन सामन्यातही सलामीला आला होता.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी केली. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. तर या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १९ षटकात ३ विकेट्स गमावले. यावेळी यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) यानेही २६ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या.

भारताने पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यातील चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्टला खेळले जाणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा..! टी२० क्रमवारीत ८ वर्षांतील सर्वात वाईट स्थानी घसरण

CWG2022: भारतीय महिला हॉकी संघाची पाचव्यांदा उपांत्यफेरीत एंट्री, कॅनडाला केले पराभूत

दुखापतग्रस्त असूनही रोहितने गाजवले मैदान! चाहते म्हणाले, ‘कॅप्टन असावा तर असा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---