टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य फलंदाज सूर्यकुमार यादवला एका खास पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सूर्यानं अंतिम सामन्यात धोकादायक डेव्हिड मिलरचा एक अविश्वसनीय झेल घेतला. यासाठी त्याला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.
अंतिम सामन्यात सूर्या फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. तो 4 चेंडूत केवळ 3 धावा करून बाद झाला. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्यानं डेव्हिड मिलरचा शानदार झेल घेतला. खरं तर, या झेलमुळेच सामना पलटला आणि भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यानंतर आता सूर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वास्तविक, शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. क्रिजवर डेव्हिड मिलरसारखा धोकादायक फलंदाज पूर्णपणे सेट झाला होता. कर्णधार रोहित शर्मानं शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी हार्दिक पांड्याला दिली. मिलरनं षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला लॉन्ग ऑनवर कडक शॉट हाणला. चेंडू खूप उंच गेला होता. एकवेळ वाटत होतं की, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराला जाईल, मात्र वाटेत आडवा आला तो सूर्या!
सूर्यानं सीमारेषवर पहिल्या प्रयत्नात झेल घेतला. परंतु त्याचं संतुलन जाणार होतं. त्यामुळे त्यानं सीमारेषेच्या पलिकेडे जाण्यापूर्वी चेंडू वर फेकला आणि नंतर पुन्हा सीमारेषेच्या आत येऊन झेल पूर्ण केला. सूर्याच्या या जबरदस्त कॅचमुळे सामन्याचं चित्र पलटलं. जर हा झेल पकडला गेला नसता, तर भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकला नसता.
सूर्याला मैदानावरील त्याच्या या शानदार कामगिरीसाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचं मेडल देण्यात आलं. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते त्याला हे मेडल मिळालं. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पत्नीनं घेतली मुलाखत पण बुमराहला शब्द फुटेना, पाहा मैदानावरील व्हिडिओ
3 खेळाडू जे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात
रोहित- कोहलीचा प्लॅन यशस्वी, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडचं भन्नाट रुप समोर