मंगळवारी (०२ ऑगस्ट) सेंट किट्स येथे झालेला तिसरा टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला आणि ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. या सामना विजयाचा शिल्पकार राहिला सूर्यकुमार यादव. पहिल्या २ सामन्यात खास खेळी न करू शकलेल्या सूर्यकुमारची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने झंझावाती अर्धशतक करत भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. यानंतर सूर्यकुमारला टी२० क्रमवारीच्या रूपात त्याच्या वादळी खेळीचे फळही मिळाले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs IND) प्रशंसनीय अर्धशतकी खेळीनंतर सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) आयसीसीच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत (ICC T20I Ranking) मोठी उडी घेतली आहे. आता तो अव्वलस्थानी पोहोचण्यापासून फक्त २ गुणांनी मागे आहे.
बुधवारी (०३ ऑगस्ट) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी२० क्रमवारीत सूर्यकुमारला मोठा फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याच्या खात्यात ८१६ गुण आहेत. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अव्वलस्थानी कायम आहे. त्याच्या खात्यात सध्या सर्वाधिक ८१८ गुण आहेत. अर्थात आता सूर्यकुमारला पहिल्या स्थानी पोहोचण्यासाठी फक्त २ गुणांची गरज आहे. याशिवाय फलंदाजांच्या ताज्या टी२० क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवणाराही तो पहिलाच भारतीय आहे.
https://www.instagram.com/p/Cgy3N03JaC9/?utm_source=ig_web_copy_link
सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक
दरम्यान सूर्यकुमारला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी२० सामन्यात सलामीला संधी मिळूनही विशेष कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात २४ तर दुसऱ्या सामन्यात ११ धावा करत तो स्वस्तात पव्हेलियनला परतला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यातून त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने सलामीला फलंदाजीला येत ४४ चेंडूत ७६ धावांची प्रशंसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ७ चौकारही मारले. त्याच्या या खेळीचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सुर्यकुमार यादवने याच क्रमांकावर फलंदाजी करावी’, माजी दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
CWG 2022 | पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात ४ पदकांची भर, वाचा खेळाडूंची कामगिरी
‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर