---Advertisement---

वक्त बदल दिया! फ्लॉप सुरुवातीनंतर सूर्याने दाखवला ‘सुपला फॉर्म’, पाहा जबरदस्त आकडेवारी

On: शनिवार, मे 13, 2023 10:00 AM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमार यादव याने आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघातील या सामन्यात मुंबईच्या विस्फोटक फलंदाजाने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची झंझावाती खेळी केली. यासह सूर्याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. या खेळीत सूर्याने 6 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. हंगामाची खराब सुरुवात झाल्यानंतर मागील सात सामन्यात त्याने दाखवलेले सातत्य जबरदस्त आहे.

आयपीएल 2023 सुरू होण्याआधी सूर्यकुमार अत्यंत खराब फॉर्ममधून जात होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तीनही सामन्यात त्याला खाते खोलता आले नव्हते. त्यानंतर आयपीएलमध्ये देखील त्याची सुरुवात अपेक्षित झाली नाही. त्याने या पाच सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ‌‌‌‌‌13च्या सरासरीने 68 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर पंजाबविरुद्धच्या सामन्यातून त्याने आपला फॉर्म पकडला. या सामन्यात त्याने 57 धावांची खेळी केली. गुजरातविरुद्ध 23 तर राजस्थानविरुद्ध 55 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली. पंजाबविरुद्ध पुन्हा एकदा 66 व चेन्नईविरुद्ध 26 धावा त्याने केल्या. आरसीबीविरुद्ध 83 व आता गुजरातविरुद्ध शतक ठोकत त्याने सर्वांची तोंडे बंद केली.

त्याच्या अखेरच्या सात सामन्यातील कामगिरीवर नजर टाकले दिसून येते की, 68.33 च्या सरासरीने त्याने 413 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 202 असा तगडा राहिला आहे.

सूर्याच्या या कामगिरीचा थेट परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर झालेला दिसून येतो. मुंबईने मागील पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला असून, त्यांनी पहिल्या चार क्रमांकामधील आपले स्थान अबाधित ठेवले आहे. उर्वरित दोन सामने जिंकून आपले अभियान दुसऱ्या क्रमांकावर संपवण्याचा त्यांचा मानस असेल.

(Suryakumar Yadav Excellent Form In Last 7 Matches For Mumbai Indians In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना जिंकला तरी रोहित म्हणतोय, “सूर्याने आमचा प्लॅन बिघडवला”, वाचा सविस्तर 
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---