भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. यामधील शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला 49 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक फलंदाजी केली. त्यानंतर संघाचा दुसरा फलंदाज सूर्यकुमार यादव याने त्याचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजीत मोठ्या प्रमाणावर बदल केले. नेहमी चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या जागी या सामन्यात दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. त्याने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय सार्थ ठरवत 21 चेंडूंमध्ये 46 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार केवळ 8 धावा करु शकला.
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार मजेत म्हणाला,
“डीकेला थोडा गेम टाईम हवा होता. मला वाटते की त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे माझा चौथा क्रमांक अडचणीत आहे. मी याबाबत अद्याप याबाबत विचार केला नाही मात्र भविष्यात पाहू काय होते.”
दिनेश कार्तिक आयपीएलनंतर संघाचा प्रमुख फिनिशर म्हणून भूमिका पार पाडत आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसले. मागील दोन सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या रायली रुसो याने धमाकेदार शतकी खेळी केली. त्याने 48 चेंडूतच 100 धावा पूर्ण केल्या. तर सलामीवीर डी कॉकने अर्धशतक साजरे केले. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 3 बाद 227 अशी मजल मारली. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली. रोहित शून्यावरच बाद झाला, तर श्रेयस अय्यरनेही एक धाव आपली विकेट गमावली. भारताकडून सर्वाधिक 46 धावा दिनेश कार्तिक याने केल्या. परिणामी, भारतीय संघाने 49 धावांनी सामना गमावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी