भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने सूर्यकुमार यादव याचे तोंड भरून कौतुक केले आहे. हरभजनच्या मते सूर्यकुमार ज्या पद्धतीने गोलंदाजांवर वर्चस्व करतो, तसे आजपर्यंत कोणताच फलंदाज करू शकला नाहीये. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रोमांचक सामना बुधवारी (3 मे) चाहत्यांना अनुभवता आला. या सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमारने या विजयात अर्धशतकाचे योगदान दिले.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023चा 46वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 18.5 षटकांमध्ये हे लक्ष्य गाठले. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मॅच विनर ठरले. ईशानने 41 चेंडूत 75 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 66 धावा कुटल्या. या दोघांव्यतिरिक्त मुंबईसाठी टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी शेवटच्या षटकांमध्ये नाबाद 19 आणि 26 धावा केल्या. सूर्यकुमारचे या सामन्यातील आणि एकंदरीत आयपीएलमधील प्रदर्शन हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला भावले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन म्हणाला की, “मी कधीच कोणाला अशा पद्धतीने गोलंदाजांवर दबाव टाकताना पाहिले नव्हते. मी खूप क्रिकेट खेळलो आहे. मी एकही खेळाडू असा पाहिला नाहीये, जो अशा पद्धतीने वर्चस्व करत असेल. एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेलची चांगले खेळळे आहेत. पण मला वाटते की, सूर्यकुमार प्रमाणे वर्चव्स करायला कोणत्याच फलंदाजाला जमले नाही. त्याच्या समोर कोणत्या गोलंदाज आहे, याचा सूर्याला फरक पडत नाही. त्याला प्रत्येक चेंडू कुठे मारायचा हे माहिती आहे. त्याच्याकडे प्रत्येक पद्धतीचे शॉट्स आहेत, ज्यावर तो चौकार मारू शकतो.”
दरम्यान, चालू आयपीएल हंगामतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार धावा करण्यासाठी झगडताना दिसला होता. मात्र मागच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट चांगलीच तळवली आहे. हंगामत त्याने आतापर्यंत तीन अर्धशतके केले आहेत आणि 267 धावांचे योगदान संघासाठी दिले आहे. (Suryakumar Yadav has dominated more than AB de Villiers and Chris Gayle Harbhajan Singh said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला ट्रोल करणाऱ्या पंजाबला मुंबईने दाखवला इंगा; ओढवली ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू