मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने शुक्रवारी (दि. 12 मे) खास पराक्रम गाजवला. वानखेडे स्टेडिअमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघातील सामन्यात सूर्यकुमार यादव याने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत खणखणीत शतक झळकावले. सूर्याच्या शतकाच्या जोरावर मुंबई संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 218 धावांचा डोंगर उभारला. (Suryakumar yadav hit first ipl century against gujarat titans in ipl 2023 57th match)
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या फलंदाजांन पंड्याचा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी मुंबईने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 218 धावा केल्या आणि गुजरातला 219 धावांचे आव्हान दिले.
सूर्यकुमारचे मोठे योगदान
मुंबई संघाला 218 धावांचा डोंगर उभारण्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. सूर्याने यावेळी फक्त 49 चेंडूंचा सामना करताना नाबाद 103 धावांचा पाऊस पाडत खणखणीत शतक झळकावले. हे सूर्याचे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. विशेष म्हणजे, सूर्याने या धावा करताना पहिल्या 18 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील 31 चेंडूत विस्फोटक फलंदाजी करत 80 धावा चोपल्या. अशाप्रकारे त्याने 103 धावा पूर्ण केल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 11 चौकारही मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 210.20 इतका होता.
.@surya_14kumar's blistering maiden IPL century powered @mipaltan to 218/5 👊
Can the @gujarat_titans chase this down? 🤔
Chase starts 🔜
Follow the Match: https://t.co/o61rmJX1rD #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/8a6TswHTZa
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
सूर्याव्यतिरिक्त मुंबईकडून फलंदाजी करताना ईशान किशन (31), विष्णू यादव (30), कर्णधार रोहित शर्मा (29) यांनी दोन आकडी धावसंख्येचे योगदान दिले. तसेच, टीम डेविड 5 धावांवर बाद झाला, तर कॅमरून ग्रीन याने नाबाद 3 धावा केल्या.
गुजरातची गोलंदाजी
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खान चमकला. त्याने यावेळी सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहित शर्मा या वेगवान गोलंदाजानेही 1 विकेट आपल्या नावावर केली.
आता हा सामना जिंकण्यासाठी गुजरातला 219 धावांचे आव्हान पार करावे लागेल. हे आव्हान गुजरात संघ पार करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Breaking । विंडीज संघाच्या Head Coach पदी ‘या’ 2 दिग्गजांची निवड, एक तर दोन वेळचा टी20 चॅम्पियन
हिंसाचाराच्या घटनांनंतर इम्रान खान यांना जामीन मंजूर, पाकिस्तान आणीबाणीच्या उंबरठ्यावर