टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लुंगी एन्गिडी (Lungi Ngidi) याने पहिल्या स्पेलमध्ये भारतीय संघाची वाताहात केली. परंतु, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पुन्हा एकदा भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शानदार अर्धशतक साजरे केले.
फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. मात्र, लुंगी एन्गिडीने चार बळी घेत भारताचा निम्मा संघ 50 धावांच्या आत तंबूत पाठवला. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने संघाचे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने सुरुवातीला सावध पवित्रा घेत आपली विकेट वाचवली. त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने केवळ 30 चेंडूवर आपले नववे अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 40 चेंडूंवर 68 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
त्याने भारतीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम त्याने या खेळीसह आपल्या नावे केला. त्याने हे अर्धशतक पूर्ण करत चौथ्या अथवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक 9 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम रचला. यापूर्वी युवराज सिंगने भारतासाठी चौथ्या अथवा त्याखालील क्रमांकवर फलंदाजी करत 8 अर्धशतके ठोकलेली. इतर फलंदाजांचा विचार केल्यास विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे व रिषभ पंत यांनी अशा परिस्थितीत प्रत्येकी तीन अर्धशतके झळकावली आहेत.
सूर्याने या खेळी दरम्यानच टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात अर्धशतके ठोकणारा केवळ दुसरा भारतीय फलंदाज होण्याचाही मान मिळवला. यापूर्वी युवराजनेच 2007 मध्ये ही कामगिरी केलेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”