भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे रविवारी (26 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभारली. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने चाहत्यांना खुश केले.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचे सोने करत यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड या जोडीने केवळ चार षटकात भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. यशस्वी वेगवान 54 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या ईशान किशन याने देखील अर्धशतक ठोकले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला.
https://www.bcci.tv/video/5560668/off-the-mark-surya-style?tagNames=2023&platform=international&type=men
सूर्यकुमार फलंदाजीला आल्यानंतर गोलंदाजी करत असलेल्या मार्कस स्टॉयनिस याने काहीशा डाव्या यष्टी बाहेर टाकलेल्या चेंडूवर सूर्या याने फ्लिक करत चेंडू प्रेक्षकांत पाठवला. या फटक्याला अनेक चाहते सुपला शॉट असे म्हणतात. यानंतर सूर्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले. बाद होण्यापूर्वी त्याने दहा चेंडूंचा सामना करताना दोन षटकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात योगदान दिले होते.
(Suryakumar Yadav Hits First Ball Six As Supla Shot Against Australia)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 साठी RCB ने रिटेन केले धाकड 18! बडे विदेशी खेळाडू बाहेर
IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी