---Advertisement---

सुपर सूर्या! एलिसला एकाच ओव्हरमध्ये ठोकले दोन ‘सुपला सिक्स’, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 8:43 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी ( 28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथे खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाला पावर प्लेमध्ये दोन झटके बसले. मात्र, त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान त्याने एकाच षटकात दोन षटकार खेचले. 

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय संघ सुरुवात चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल केवळ सहा धावा काढून माघारी परतला. त्यानंतर ईशान किशन खातेही खोलू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्याने दोन षटकार मारत चांगली सुरुवात केली.

https://twitter.com/BCCI/status/1729502326400925977?t=DC_d-SIhxVWlLH5NSAhbGw&s=19

नॅथन एलिस टाकत असलेल्या पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार याने उत्तुंग षटकार ठोकला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर देखील त्याने शानदार फ्लिक करत सुपला शॉट मारून षटकार वसूल केला. संघ दबावात असताना त्याने आक्रमक धोरण स्वीकारून धावा वसूल केल्या. त्याने बाद होण्यापूर्वी 29 चेंडूमध्ये 39 धावा केल्या. यामध्ये पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.

(Suryakumar Yadav Hits Two Supla Shot Sixes Against Australia In Guwahati T20I)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---