भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना नागपुरमध्ये सुरु आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने ही कसोटी मालिका खेळवली जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ही मालिका भारतीय संघाने दोन विजयाच्या फरकाने जिंकल्यास भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळेल. या मालिकेची चर्चा सुरू असतानाच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रमीझ राजा यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून मोठे आव्हान असेल. विशेषत: या मालिकेतील खेळाडूंची निवड अत्यंत निर्णायक ठरेल. ते म्हणाले की, “भारतीय संघाला त्यांच्या घरचे मैदान असल्याने फायदा मिळेल. मात्र, पाहुण्या संघाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार यात शंका नाही.”
परिस्थितीशी ताळमेळ साधणे खूप महत्त्वाचे ठरेल
रमीझ राजा यांच्या मते, पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान असे कोणतेही सत्र नसेल, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ सहज हार मानेल. चांगल्या खेळाडूंच्या निवडीशिवाय भारतीय संघाला सकारात्मक मानसिकतेने खेळावे लागेल. याशिवाय परिस्थितीशी ताळमेळ साधणे खूप महत्त्वाचे ठरेल.
हा खेळाडू संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल
यासोबतच त्यांनी भारतीय संघाच्या सलामीवीरांबाबतही आपले मत व्यक्त केले. तसेच राजा म्हणाले की, भारतीय संघाने सूर्यकुमार यादवचा त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे, हा खेळाडू संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल. कारण त्याच्यात जलद धावा करण्याची क्षमता आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला होईल.
(Suryakumar Yadav Is X Factor For India In Nagpur Test Ramiz Raza Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 75 वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता पहिला कसोटी सामना
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव






