---Advertisement---

सूर्यकुमार यादव इतिहास रचण्याच्या जवळ, असं करताच मोडेल धोनी अन् कार्तिकचा विक्रम

On: बुधवार, जून 19, 2024 3:38 PM
Suryakumar-Yadav-Injury
---Advertisement---

भारतीय संघाला 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 चा पहिला सामना खेळायचा आहे. साखळी फेरीत टीम इंडियानं आपले तिन्ही सामने जिंकले होते. आता सुपर 8 मध्ये भारताचा सामना अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाशी होणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 3 टी20 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारतीय संघानं तिन्ही सामने जिंकले आहेत. मात्र यावेळी भारताला अफगाणिस्तान संघापासून सावध राहावं लागेल. कारण या विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघात नक्कीच अपसेट करण्याची क्षमता आहे. या महत्त्वाच्या सामन्यात सर्वांच्या नजरा भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादववर असतील.

सूर्यकुमार यादवला या सामन्यात एक खास रेकॉर्ड करण्याची संधी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्या जर 60 धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत महेंद्रसिंह धोनी आणि दिनेश कार्तिकच्या पुढे जाईल.

धोनीनं टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7432 धावा केल्या आहेत. तर कार्तिकच्या नावे 7407 धावा आहेत. सूर्यकुमारनं आतापर्यंत टी20 मध्ये एकूण 7373 धावा केल्या आहेत. म्हणजेच 60 धावा केल्यानंतर सूर्या कार्तिकसह धोनीलाही मागे टाकेल. असं केल्यानंतर सूर्या टी20 मध्ये  सर्वाधिक धावा करणारा भारताचा सहावा फलंदाज ठरेल.

टी20 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणार भारतीय खेळाडू आहे. त्यानं 12740 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माच्या नावे 11641 धावा आहे. याशिवाय शिखर धवननं 9797 धावा केल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

12740 – विराट कोहली
11641- रोहित शर्मा
9797- शिखर धवन
8654 – सुरेश रैना
7586 – केएल राहुल
7432 – महेंद्रसिंह धोनी
7407- दिनेश कार्तिक
7373 – सूर्यकुमार यादव

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियात होणार नव्या विकेटकीपरची एंट्री! मयंक यादवला संधी मिळणार का?
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचे नवे फिल्डिंग कोच? गौतम गंभीरशी काय चर्चा झाली?
नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की भोवली, बांगलादेशच्या खेळाडूवर आयसीसीची कठोर कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---