---Advertisement---

Mi vs PBKS: सूर्यकुमार यादव इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या तयारीत

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील 69 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mi vs PBKS) दोन्ही संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नजरा इतिहास रचण्यावर असतील. सूर्यकुमार यादवने या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने 13 सामन्यात 72.87 च्या सरासरीने आणि 170.46 च्या स्ट्राईक रेटने 583 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 अर्धशतक झळकावली आहेत. सूर्यकुमार यादवने या हंगामात 500 धावसंख्या जेव्हा पूर्ण केली तेव्हाच मुंबईसाठी एका हंगामात 3 वेळा 500 आणि त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे.

सूर्यकुमार यादव जर पंजाब विरुद्ध सामन्यात 36 धावा अजून करू शकला, तर तो आयपीएलच्या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) आहे. ज्यांनी 2010 मध्ये 47.5 च्या सरासरीने आणि 133 च्या स्ट्राईक रेटने 618 धावा केल्या होत्या. या यादीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमारच आहे. तसेच चौथ्या स्थानावर सचिन आणि पाचव्या स्थानावर लेंडल सिमंस आहे.

सूर्यकुमार यादव या हंगामात पाच वेळा नाबाद खेळलेला आहे आणि बाकी सामन्यात सुद्धा नाबाद राहून खेळण्याचा तसेच मोठी पारी खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जर सूर्यकुमारने अशाच पद्धतीने प्रदर्शन केले तर तो विराट कोहलीच्या कोणत्याही एका हंगामात सर्वाधिक सरासरीने धावा करणारा फलंदाज ठरेल.

आयपीएलच्या कोणत्याही हंगामात कमीत कमी 500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वात चांगली सरासरीचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. ज्याने 2016 मध्ये 16 डावांमध्ये 81.1 च्या सरासरीने 973 धावा केल्या होत्या. त्यादरम्यान विराट कोहलीचे स्ट्राईक रेट 152 होते. सूर्यकुमार यादव या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

ही एक सुद्धा खास बाब आहे की, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही हंगामात 170 + अधिक स्ट्राईक रेट 70+ सरासरीने 500 पेक्षा जास्त धावा करणारा एकमात्र फलंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---