भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अप्रतिम कामगिरी केली आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि शुबमन गिल या मालिकेतून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. दोघेही सध्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. या दरम्यान सूर्यकुमार यादव जोरदार सराव करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सूर्यकुमार यादव भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि याच मालिकेत त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. इंग्लंडनंतर श्रीलंका दौऱ्यावर देखील त्याने चमकदार कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संधी मिळताच तो चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत तो जेम्स एँडरसनचा सामना करण्यासाठी सूर्यकुमार यादव विलगीकरणात असूनही मेहनत घेत आहे. एक्सरसाईज बाईकच्या पुढे एक टॅब लावला आहे. ज्यावर तो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेला पहिला कसोटी सामना पाहताना वर्कआऊट करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन म्हणून ‘परफेक्ट सेटिंग’ असे लिहिले आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला असून, भारतीय संघाला विजयासाठी आणखी १५७ धावांची आवश्यकता आहे.(Suryakumar yadav preparing himself to play against James Anderson)
Suryakumar Yadav is watching the India vs England Test match while doing workouts in Quarantine times period. pic.twitter.com/WGVNnRjB8O
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 8, 2021
सूर्यकुमार यादवची कारकीर्द
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ७७ सामने खेळले आहेत. ४४.०१ च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १४ शतक आणि २६ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली
-रिषभच्या छोटेखानी खेळीचा ‘हा’ पाकिस्तानी दिग्गजची बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक
-IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग