---Advertisement---

“मला पाकिस्तानला जागतिक कसोटी अजिंक्यपदचे विजेतेपद मिळवून देण्याची इच्छा”

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 4:24 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २ वर्षांपूर्वी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्येही भर पडल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करुन पटकावले. तसेच आता या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वालाही इंग्लंड-भारत कसोटी मालिकेने सुरुवात झाली आहे. याचदरम्यान पाकिस्तान कसोटी संघाचा फलंदाज अझर अलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अझर अलीने म्हटले आहे की कारकिर्दीत एकदा त्याला पाकिस्तानला जागतिक कसोटी अजिंक्यपदचे विजेतेपद मिळवून देण्याची इच्छा आहे. त्याने म्हटले आहे की,कसोटी क्रिकेट हे खरे क्रिकेट आहे आणि चाहत्यांना त्यात रोमांचक सामने पाहायला मिळतात. अझर अलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, ‘आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ही एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि यामुळे, कसोटी क्रिकेटमध्ये बरीच स्पर्धा वाढेल. माझ्या कारकिर्दीत पाकिस्तानने जागतिक कसोटी अजिंक्यपदचे जेतेपद पटकावावे अशी माझी इच्छा आहे. कसोटी क्रिकेट हा एक जबरदस्त प्रकार आहे आणि अजूनही चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे चाहते तर अजूनही कसोटी सामन्याची वाट पाहत असतात.’

अझर अलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आणि त्याची तयारी कशी सुरू आहे हेही त्याने सांगितले. अझहर अली म्हणाला,”वेस्ट इंडिजचा दौरा कधीच सोपा नसतो आणि आम्ही या मालिकेतील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. वेस्ट इंडिजची गोलंदाजी खूप चांगली आहे, पण आमचे फलंदाजही उत्कृष्ट लयीत आहेत. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानही चांगल्या लयीत आहेत आणि त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. याशिवाय आबिद अली आणि फवाद आलम हेही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत”.

अझहर अलीने असेही सांगितले की, त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करायची आहे आणि त्यासाठी वेस्ट इंडिज मालिका जिंकणे आवश्यक आहे. अली म्हणाला, “मला असे वाटते की जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सुरुवात विजयाने व्हावी. मागच्या वेळी आम्ही पाहिले की जेव्हा एका संघाला आघाडी मिळाली, तेव्हा तो इतर संघांवर दबाव टाकू शकतो. आमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे आणि आम्हाला बांगलादेशविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे. म्हणून आम्ही या संधीचा पुरेपूर लाभ घेऊ इच्छितो.”

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान संघात १२ ऑगस्टपासून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल ८९ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! भारतीय संघाकडे ‘हा’ विक्रम करण्याची संधी

ये इंडिया है बॉस! नॉटिंघम स्टेडियममध्येही झाला नीरजच्या सोनेरी कामगिरीचा जयघोष, पाहा व्हिडिओ

‘मॅन ऑन मिशन!’ जेम्स एँडरसनचा सामना करण्यासाठी विलगीकरणात असूनही सूर्यकुमार यादव ‘अशी’ घेतोय मेहनत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---