---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारताचे उघडले डोळे, आता ‘या’ खेळाडूचे पुनरागमन निश्चित! खुद्द कोचनेच दिले संकेत

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 10:17 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताच्या विजयाची मालिका खंडित झाली आहे. भारताला या स्पर्धेत १२ सामन्यांनंतर पराभवाचा सामना करावा लागला आणि हे काम दक्षिण आफ्रिकेने केले आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) झालेल्या सुपर-८च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. भारताच्या या पहिल्या पराभवाने संघाचे डोळे उघडले असतील. यामुळे पुढील सामन्यांमध्ये भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल पाहायला मिळतील. याचे संकेत खुद्द भारताचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघात बदलाची शक्यता वाढली आहे. डोशेटने पत्रकार परिषदेत संजू सॅमसनच्या अंतिम अकराच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहे. भारतीय संघाची या स्पर्धेतील सलामीची भागीदारी पाहिली तर हा बदल महत्वाचा ठरू शकतो. “या स्पर्धेत पाच पैकी चार संघाने पार्ट-टाईम ऑफ स्पिनरकडून सामन्याची सुरूवात केली आणि प्रत्येक वेळी विकेटही घेतली. त्यामुळे भारताच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात विकेट पडत गेल्या आणि मधल्या फळीवर अधिक दबाव आला. अशात तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे पण मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरत आहेत,” असे डोशेट म्हणाले आहेत.

“आम्ही संघात मागील १८ महिन्यांमध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली त्यांना घेतले आहे, मात्र काही धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. अशा स्थितीत संजू सॅमसनला संघात आणावे, जो एक वरच्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज आहे. याचा संघाला फायदा होईल”, असे डोशेट यांनी सांगितले. तसेच हा पुढील सामन्यांसाठी महत्वाचा मुद्दा ठरेल.

संजूने या स्पर्धेत नामिबियाविरुद्ध खेळला आहे. यामध्ये त्याने ८ चेंडूत २२ धावा केल्या होत्या आणि ईशान किशनसोबत २५ धावांची भागीदारी केली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील भारताची ही पहिल्या विकेटसाठीची आतापर्यंतची मोठी भागीदारी ठरली. यूएसए, पाकिस्तान, नेदरलॅंड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने सुरुवातीलाच विकेट्स गमावल्याने त्यामध्ये १० धावांपेक्षाही अधिक धावांची भागीदारी झाली नाही.

या स्पर्धेत भारतीय फलंदाज ऑफ स्पिन गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. विरोधी संघ याचाच फायदा घेत असल्याने भारताची टॉप-ऑर्डर कमकुवत झाली आहे. या फळीमध्ये सर्वाधिक डावखुरे फलंदाज आहेत. यामुळे पुढील सामन्यांसाठीचा विचार करता भारताला लवकर निर्णय घ्यावे लागतील, कारण झिम्बाब्वेकडे सिंकदर रजा आणि ब्रायन बेनेट असून वेस्ट इंडिजकडे रोस्टन चेज हे ऑफ स्पिनर आहेत. यासाठी भारताकडे संजूचा पर्याय उपलब्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---