मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये खास ऑफर मिळाली आहे. आयपीएल 2024 ची चॅम्पियन टीम कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला मोठी ऑफर दिली आहे.
‘स्पोर्ट्सकीडा’च्या वृत्तानुसार, केकेआरनं सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची अनऑफिशियल ऑफर दिली आहे. आता सूर्यकुमार यादव ही ऑफर स्वीकारतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. सूर्यकुमार यादवनं केकेआरसाठी आयपीएल पदार्पण केलं होतं. मात्र गेल्या अनेक हंगामांपासून तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. आता त्याच्याकडे आपल्या जुन्या संघात कर्णधार म्हणून परतण्याची संधी आहे.
सूर्यकुमार यादवनं 2014 मध्ये केकेआरसाठी पदार्पण केलं होतं. तो आयपीएल 2018 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्समध्ये गेला. केकेआरमध्ये सूर्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. तो मुख्यतः खालच्या फळीत फलंदाजी करायचा. मात्र, मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर त्याचं नशीब बदललं. सूर्यकुमार यादव आज भारतीय टी20 संघाचा कर्णधार आहे, यामागे मुंबई इंडियन्ससाठीच्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा मोठा वाटा आहे. मुंबईत सूर्याला अव्वल फळीत सतत संधी मिळाल्या, ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.
सूर्यकुमार यादवनं आयपीएलमध्ये 150 सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 3594 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 2 शतकं आणि 24 अर्धशतकं आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 145 एवढा राहिला आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं गेल्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावलं होतं. मात्र, आता संघाला आपल्या नेतृत्वात बदल करायचा आहे, असं दिसतं. मेंटॉर गौतम गंभीरच्या जाण्यानंतर श्रेयस अय्यरलाही कर्णधारपदावरून दूर केलं जाऊ शकतं. कदाचित याच कारणामुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली आहे.
हेही वाचा –
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
निवृत्त झाल्यानंतरही धवनचा दबदबा कायम! सेना देशात अशी कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य