आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (19 एप्रिल) ताजी क्रिवारी जाहीर केली. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखू शकला आहे. सूर्यकुमार मागच्या काही महिन्यांमध्ये चाहत्यांची निराशा करताना दिसला असला, तरी आयसीसी क्रमवारीत त्याचे स्थान अजूनही कोणी घेऊ शकले नाहीये.
पाकिस्तानचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत आपल्या तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यानेही राखले आहे. टी-20 फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याच्याकडे सध्या 906 रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद रिजवानला ताज्या क्रमवारीत 13 रेटिंग पॉइंट्सचे नुकसान झाले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील बाबरला 14 रेटिंग पॉइंट्सचा फायदा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बाबरने शतक ठोकल्याचा फायदा पाकिस्तानच्या कर्णधाराला झाल्याचे क्रमवारीत पाहायला मिळाले आहे. बाबरकडे सध्या 769, तर रिझवानकडे 798 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराट कोहली (Virat Kohli) टी-20 फलंदाजांच्या यादीत 612 रेटिंग पॉइंट्ससह 15व्या स्थानावर आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. पाकिस्तान आपल्या मायदेशातील या मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. वेगवान गोलंदाज हारिस रौफ () याने मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. हॅरिस रौफला या अप्रतिम गोलंदाजीचा पायदा टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत मिळाला आहे. तो आता गोलंदाजांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा एकही गोलंदाज पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये सामील नाहीये. तेराव्या क्रमांकावर शादाब खान, तर 15व्या क्रमांकावर शाहीन आफ्रिदी आहे. रौफकडे 657, शादाबकडे 641, तर शाहीन आफ्रिदीकडे 324 रेटिंग पॉइंट्स आहेत. (Suryakumar Yadav remains at number one in the latest ICC T20 rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होम ग्राउंडवर नाणेफेक राजस्थानच्या पारड्यात, पाहुण्या लखनऊला ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करावी लागणार प्रथम फलंदाजी
SRHvsMI । टॅलेंटवर भारी पडला अनुभव, पियुष चावलाच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला थ्रिल